Pune crime : लय येडे चाळे करू नको म्हणत कोयत्यानं सपासप् वार; तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आकाश संतोष देवरुखे (वय 22, रा. दांडेकर पूल) या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi police station) फिर्याद दिली आहे. तर या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

Pune crime : लय येडे चाळे करू नको म्हणत कोयत्यानं सपासप् वार; तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 01, 2022 | 7:37 PM

पुणे : शिवीगाळ का करता, असे विचारले म्हणून एकावर कोयत्याने वार (Attack with a sharp weapon) करण्यात आले आहेत. दांडेकर पुलावरील माऊली मेडिकलसमोर हा प्रकार घडला आहे. रिक्षात बसलेल्या एका तरुणाला दोघाजणांनी खाली उतरायला भाग पाडले. एवढेच नाही, तर त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता, असे यावेळी तरुणाने त्या दोघांना विचारले तर त्यांनी तरुणाला मारहाण (Beaten) केली तसेच कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्नदेखील केला. बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आकाश संतोष देवरुखे (वय 22, रा. दांडेकर पूल) या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi police station) फिर्याद दिली आहे. तर या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

‘याला खल्लास करून टाक’

मनोज उर्फ मन्या दिनेश मेरवाडे आणि ऋतिक शरद सोनवमे (वय 19, दोघेही रा. दत्तवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र अनिल शिंदे (रा. कोथरूड) हे रिक्षात बसून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा मन्या आणि ऋतिक तेथे आले. त्यांनी फिर्यादीला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळही केली. लय येडे चाळे करू नको, नीट राहा असे मनोज यावेळी आकाशला म्हणाला. त्यावर मला शिवीगाळ करू नका, असे आकाश म्हणताच ऋतिक याने मनोज याला खल्लास करून टाक, असे म्हटले. मनोजने कमरेला लावलेला कोयता काढला आणि आकाशच्या डोक्यात मारला. आणखी दोन-तीन वार त्याने केले. तर ऋतिक याने लोखंडी रॉडने मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

जखमी अवस्थेत रुग्णालयात

मारहाण होत असताना आकाश तेथून जाऊ लागला तर या दोघांनी त्याचा पाठलाग केला. पळता पळता आणखी एक वार मनोजने केला, तो आकाशच्या पाठीवर लागला तसा तो खाली पडला. त्यानंतरही या दोघांनी आकाशला मारहाण केली. मनोजने कोयत्याने आणखी एक वार केला. तो आकाशच्या मांडीवर बसला. जखमी अवस्थेत आकाश जवळच्या रुग्णालयात गेला, तेव्हा दोघेही पळून गेले. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर वार झाल्याने शरीरावर अनेक जखमा आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून ससूनमध्ये हलविले आहे. तर दत्तवाडी पोलिसांनी या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें