Pune Dilip Walse Patil : सुखी संसारासाठी पुरूष जेवढा बाहेर तेवढं चांगलं; आंबेगावात दिलीप वळसे पाटलांच्या अजब सल्ल्यानं उपस्थितांत हशा

जेवढे पुरूष बाहेर असतील तेवढे चांगले. मी काही अंदाजे बोलत नाही. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी घरांतील वाद वाढले होते. आमच्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार हे बोलत असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Pune Dilip Walse Patil : सुखी संसारासाठी पुरूष जेवढा बाहेर तेवढं चांगलं; आंबेगावात दिलीप वळसे पाटलांच्या अजब सल्ल्यानं उपस्थितांत हशा
गृहमंत्री दिलीप वळसेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 5:33 PM

आंबेगाव, पुणे : सुखी संसारासाठी घरी न राहता नवऱ्याने बाहेर राहणेच योग्य, असा अजब सल्ला भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उपस्थितांना दिला आहे. तर लॉकडाऊनच्या काळात गृहकलह आणि घटस्फोटांचे (Divorce) प्रमाण वाढल्याचाही दावा गृहमंत्री वळसे पाटील यांनी केला आहे. ते आंबेगावात (Ambegaon) बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान ते बी. डी. काळे महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलत होते. सभेमध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भरसभेत हास्यकल्लोळ झाला. तर आपल्या या विधानबाबत पुन्हा सारवासारव करत गृहकलह आणि घटस्फोटाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

अहवालाचाही दिला दाखला

जेवढे पुरूष बाहेर असतील तेवढे चांगले. मी काही अंदाजे बोलत नाही. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी घरांतील वाद वाढले होते. आमच्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार हे बोलत असल्याचे ते म्हणाले. मात्र हे वाद आपल्याकडे नाही तर परदेशातील असल्याची सारवासारव त्यांनी केली. त्यांनी हे वक्तव्य गंमतीदारपणे केले होते, गांभीर्याने नाही असे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

‘आपली कामे करावी’

ते पुढे म्हणाले, की घरात वाद वाढण्यामागे कामेही कारणीभूत असतात. ज्याचे काम त्याने करावे. गृहिणींनी आपले काम करावे, पुरुषांनी आपली कामे करावी. ही कामे काही वाटून घेतलेली नसतात. मात्र पुरुषांनी पुरुषांची कामे आणि स्त्रीयांनी आपली कामे केल्यास वाद होणार नाही. संसार सांभाळावा, मुलांचे योग्य संगोपन करावे, असेही ते यावेळी म्हणाले. कोरोनाच्या जवळपास अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक पती-पत्नी घरी होते. बंदिस्त असल्याने एकमेकांचा अधिक संपर्क आणि त्यामुळे घरगुती अनेक छोट्या मोठ्या वादापासून घटस्फोटापर्यंतची प्रकरणे घडली होती. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मिश्कीलपणे टिप्पणी करत वस्तूस्थितीवर बोट ठेवले. महाविद्यालयीन तसेच आंबेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.