DSK : डीएसकेचं कर्जघोटाळा प्रकरण आता कोर्टात जाणार, जनहित याचिका दाखल होणार; 500 कुटुंब झालीत हवालदिल

कर्जदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घरासाठी कर्ज काढले. ते कर्जदाराच्या खात्यावर जमा करण्याऐवजी बँकांनी परस्पर ते बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात जमा केले. घर ताब्यात न मिळता कर्जाचे हप्ते मात्र सुरू झाले.

DSK : डीएसकेचं कर्जघोटाळा प्रकरण आता कोर्टात जाणार, जनहित याचिका दाखल होणार; 500 कुटुंब झालीत हवालदिल
डीएसके (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 2:31 PM

पुणे : डीएसके कर्जघोटाळा प्रकरणी (DSK Debt Scandal Case) आता जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. पुणेकर नागरिक कृती समितीने हा निर्णय घेतला आहे. डी. एस. कुलकर्णी यांना अवाजवी कर्जाचा पुरवठा केल्याप्रकरणी गृह कर्जधारकांचे कर्ज माफ करणे, सिबील स्कोअर सुधारावा, ईएमआय न घेण्याच्या मागण्यांविषयी निर्णय घेण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी दिला होता. मात्र या बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून अद्यापही मुदत वाढवून मागितली जात असल्याचे या सर्व प्रकरणात टाळाटाळ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणए नागरिक कृती समितीने याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे. डीएसके आणि बँका-फायनान्स कंपन्या यांनी संगनमताने फसवणूक (Cheating) केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ

विभागीय आयुक्तांबरोबर बैठक झाली. पहिल्या बैठकीनंतर बँका, फायनान्स कंपन्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली. त्यांनी व्याज माफ करण्याची तयार दर्शवली. त्यामुळे गृहकर्जधारकांचे सिबील सुधारणा होईल. मात्र ते कर्जमाफीला तयार नाही. कर्जधारकांच्या नावाने रक्कम तशीच दाखवू, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनीही या बँका आणि फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयाकडूनच गुन्हा दाखल करण्याचे आदेश मागणार आहोत, असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

500 कुटुंबांनी केले होते आंदोलन

कर्जदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घरासाठी कर्ज काढले. ते कर्जदाराच्या खात्यावर जमा करण्याऐवजी बँकांनी परस्पर ते बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात जमा केले. घर ताब्यात न मिळता कर्जाचे हप्ते मात्र सुरू झाले. अशा जवळपास 500 कुटुंबांनी आंदोलनही केले होते. या आंदोलनाची दखल नॅशनल हौसिंग बँकेने घेत कर्जदारांच्या पुणेकर नागरिक कृती समितीबरोबर संपर्क साधला आणि यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

काही कोटी रुपयांचा घोटाळा

ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्या एका सदनिकेची किंमत जवळपास 30 ते 35 लाख होती. दहा टक्के रक्कम डीएसके यांनी आधीच घेतली होती. उर्वरित रकमेसाठी कर्ज काढण्यात आले. 500 जणांचे प्रत्येकी काही लाख रुपयांचे कर्ज याप्रमाणे हा काही कोटी रुपयांचा घोटाळा आहे. जे कर्जदार आहेत ते बँकांच्या तगाद्यामुळे हैराण झाले आहेत. इतर कर्ज मिळवण्यातही त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.