Pune :पुण्यात प्रवीण मसाल्याचे संस्थापक उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांनी 92 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पत्नी कमलाबाई चोरडिया या कल्पनेतून मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढे आली. हळू-हळू हे मसाले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. त्याची मागणी वाढली यातून व्यापक स्वरूपाचा उद्योग उभा राहिला. प्रवीण मसाले उद्योग समूहाकडून महाराष्ट्रीय धाटणीच्या मसाल्याची निर्मिती केली जाते.

Pune :पुण्यात प्रवीण मसाल्याचे संस्थापक उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांनी 92 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Hukmichand Sukhlal ChordiaImage Credit source: google
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:43 PM

पुणे – घरोघरी प्रवीण मसाल्याची चव, सुंगध पोहचवणारे प्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (Hukamichand Sukhlal Chordia)यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 वर्षाचे होते. प्रवीण मसाल्याचे( Pravin Masala)  ते संस्थापक होते. 1962 ला त्यांनी प्रवीण मसाले या कंपनीची स्थापना केली. या मसाल्याच्या माध्यामातून घरोघरी पोहचले. प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40-50 वर्ष अविरत कष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या(Pune)  वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . चोरडिया यांच्या निधनानं उद्योग जगतात शोककळा पसरली आहे.

पत्नीच्या कल्पनेतून आली मसाल्याची आयडिया

मारवाडी कुटुंबातील असलेले हुकमीचंद सुखलाल चोरडिया हे अहमदनगर जिल्ह्यातील. त्याच्या पत्नी कमलाबाई चोरडिया या कल्पनेतून मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढे आली. हळू-हळू हे मसाले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. त्याची मागणी वाढली यातून व्यापक स्वरूपाचा उद्योग उभा राहिला. प्रवीण मसाले उद्योग समूहाकडून महाराष्ट्रीय धाटणीच्या मसाल्याची निर्मिती केली जाते. शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणात खास तडका चवीसाठी हे मसाले वापरले जातात. विशेष मांसाहारी जेवणात आजही अनेक ठिकाणी प्रवीण मसाल्याचा वापर केला जातो.घरातून सुरु झालेल्या या उद्योगाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील 9 राज्यांत हे मसाले मिळतातया बरोबरच 25 देशांतही ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रदेशातही आपल्या चवीचा, खुशबुदार मसाल्याचा सुगंध पोहवला आहे.

बदलाची वृत्ती ठेवली

प्रवीण मसाले उद्योग समूह मोठा करत असताना चोरडियांनी गरजेनुसार बदलण्याची सवय ठेवली. जागतिक पातळीवर आपल्या मसाल्याना सिद्ध करण्यासाठी चोरडिया कायम तत्पर असलेले पाहायला मिळाले. दीर्घकाळ व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कायम मोठा विचार केला. वेळोवेळी आपल्या चुका सुधारल्या.व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी बदलही स्वीकारले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.