AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेत केली ही मागणी, म्हणाल्या…

पुणे कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यातील कोथरूड परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या शरद मोहोळ याला दिवसाढवळ्या संपवलं गेलं. अशातच मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेतली होती.

Pune | शरद मोहोळच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेत केली ही मागणी, म्हणाल्या...
Swati mohol meet devendra fadanvis in pune
| Updated on: Jan 07, 2024 | 11:06 PM
Share

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घराजवळच त्याचा साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने साथीदारांच्या मदतीने गोळीबार केला होता. दुपारी दीड वाजता शरद मोहोळ याला जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोहोळची पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. अशातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. स्वाती मोहोळ यांनी 2022 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. स्वाती मोहोळ यांचा  कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला होता.

स्वाती शरद मोहोळ यांना त्याच्या वॉर्डमधून नगरसेवकाचं तिकीट मिळणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात होतं.

लग्नाच्या वाढदिवशी वाजवला गेम

दरम्यान, शरद मोहोळ याची ज्या दिवशी हत्या झाली त्याचदिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. मात्र  मोहोळवर त्याचाच साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर याने गोळीबार करत त्याला संपवलं. पोळेकर फक्त मोहरा असून त्याचा मामा नामदेव कानगुडे हा मास्टरमाईंड असल्याचं बोललं जात आहे. कारण शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे यांच्यात वाद झाला होता. याच राग डोक्यात धरत पोळेकरला मोहोळ गँगमध्ये पेरत पूर्ण रेकी करत त्याचा गेम केला.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.