AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बैठका घेताय अजितदादा, दोन ‘दादां’च्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी

pune ajit pawar and chandrakant patil news : पुणे जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या दोन 'दादां'मधील वादाचा परिणाम भाजप कार्यकर्त्यांवर होत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बैठका घेताय अजितदादा, दोन 'दादां'च्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी
ajit pawar and chandrakant patil
| Updated on: Aug 28, 2023 | 1:20 PM
Share

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना-भाजपशी घरोबा केला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. आता अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. परंतु भाजपलाही हे पद आपल्याकडेच हवे आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष पाहण्यास मिळत आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होत आहे.

अजित पवार यांच्यांकडून कुरघोडी

पुण्याच्या कारभारात अजित पवार गटाकडून कुरघोडी केली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात बैठकांचा धडाखा लावला आहे. मात्र या बैठकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील नसतात. अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांचा धडका

अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे दौरे केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी बैठका घेण्याचा धडका लावला आहे. तसेच जुन्या विधानभवनात वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत. पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील या बैठकांना नसतात. जिल्ह्यातील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितमध्ये अजित पवार हेच बैठका घेत आहेत.

काय म्हणाले अजित पवार

बैठकासंदर्भात माध्यमांनी अजित पवार यांना विचारले असते, ते म्हणाले की, मी ही मंत्री आहे. मला बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वैतागले आहेत. कोणाचे ऐकायचे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार

भाजपचे कार्यकर्ते प्रशासनाकडे कामे घेऊन गेल्यास त्या ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आधीच असतात. त्यांची कामे होतात. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाही. सर्वच कार्यकर्त्यांना हा अनुभव येत आहेत. यामुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय पुणे जिल्ह्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.