राज्यात थंडीची चाहूल, तीन दिवसांत हुडहुडी वाढणार

weather update in maharashtra | राज्यात आता कडक्याची थंडी सुरु होणार आहे. राज्यात आणि देशात थंडी वाढणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात गारवा वाढला आहे. पुणे, मुंबई शहरातील तापमान घसरले आहे. येत्या तीन दिवसांत थंडी अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात थंडीची चाहूल, तीन दिवसांत हुडहुडी वाढणार
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 9:19 AM

पुणे, दि. 20 नोव्हेंबर | देशातील अनेक भागात परिस्थिती बदलली आहे. देशातील काही भागांत थंडी वाढली आहे. थंडीचा हा जोर आता महाराष्ट्रात असणार आहे. येत्या गुरुवारपासून राज्यात आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसह बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. राज्याच्या काही भागांत थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तसेच पुढील तीन दिवस किमान तापमानात घटीचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत अजून फारशी थंडी पडली नाही. परंतु आता थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमान घटणार

राज्यात सध्या कोरडे वातावरण असून पुढील तीन दिवस तापमान आणखी कमी होणार आहे. राज्यातील बहुतेक भागांत किमान तापमानात घट होणार आहे. तापमानातील ही घट सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामानविषयक परिस्थिती सक्रीय नाही. राज्यभरात सध्या कोरडे हवामान आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम असणार आहे.

विदर्भात गारठा वाढणार

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवणार आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले. गोंदियात १५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील तापमान १६.९ अंश सेल्सियस होते. मुंबईत २४ अंश सेल्सिअस तापमान होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

अंडी महागण्याची शक्यता

मुंबईत थंडीच्या दिवसांत अंडी महगण्याची शक्यता आहे. ५ रुपयाचे अंडे ७ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. कुक्कुटपालनाचा खर्च वाढल्यामुळे प्रती अंडे २ रुपये वाढण्याची शक्यता आहे. अंड्याचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमान घटले

दिवाळीनंतर नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घटले आहे. जिल्ह्यात सपाटी भागात तापमान १९ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. सातपुड्याचा दुर्गम भागात हे तापमान १५°c पर्यंत असल्याने जिल्ह्यात सकाळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान अजून घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त केली गेली आहे. वातावरणातील गारठा रब्बी हंगामासाठी चांगला आहे.

Non Stop LIVE Update
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.