AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या

पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चे, सभा आणि आंदोलनांवर पूर्ण बंदी असून पुणे महापालिकेनेही इंधन बचतीसाठी कार पुलिंगचे आदेश दिले आहेत. जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार.

पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
pune
| Updated on: May 26, 2026 | 8:27 AM
Share

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने आज रात्रीपासून (२६ मे) पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हा आदेश २६ मे २०२६ ते ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात विविध संघटना आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर पूर्ण बंदी असणार आहे.

तसेच, पुणे महानगरपालिकेनेही इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘कार पुलिंग’ आणि ‘वर्क फ्रॉम होम/ऑनलाईन बैठका’ अनिवार्य करणारे कडक आदेश जारी केले आहेत.

कशी असेल जमावबंदी?

  • पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या १४ दिवसांत खालील गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असणार आहेत.
  • सभा आणि आंदोलनांवर बंदी: शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई: सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास सक्त मनाई आहे.
  • शस्त्र बाळगण्यावर निर्बंध: तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शरीराला इजा पोहोचवू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगता येणार नाही.
  • ज्वलनशील पदार्थांवर बंदी: कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सार्वजनिक ठिकाणी सोबत नेण्यावर निर्बंध असतील.
  • घोषणाबाजी आणि चिथावणीखोर गाणी: सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणे यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांकडून तातडीने कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.

पुणे महापालिकेचे इंधन बचतीचे कडक आदेश

एककीडे पोलिसांची जमावबंदी लागू असताना, दुसरीकडे पुणे महानगरपालिकेने वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वाहन वापराबाबत कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी जाणाऱ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहन न वापरता एकाच वाहनाने (कार पुलिंग) जाणे स्पष्ट आदेशात नमूद केले आहे.

तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी मंत्रालय, उच्च न्यायालय किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस, रेल्वे, मेट्रो किंवा लोकलचा वापर करावा लागेल. आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे अनिवार्य आहे. पालिकेच्या सर्व बैठका, प्रशिक्षण सत्रे आणि चर्चासत्रे आता प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जातील, असेही या आदेशात म्हटले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ