AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात खलबतं, बंडखोरी आणि झुंज, दिवसभरात चिक्कार घडामोडी, काय-काय घडलं?

कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय.

पुण्यात खलबतं, बंडखोरी आणि झुंज, दिवसभरात चिक्कार घडामोडी, काय-काय घडलं?
| Updated on: Feb 07, 2023 | 11:36 PM
Share

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही एकमेकांचे समर्थक आमनेसामने आलेत. त्यामुळे 10 तारखेपर्यंत बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीतल्या बंडखोरीवरचा हा ट्रेलर समोर आलाय. पोटनिवडणुकीचा प्रचार अजून सुरुच व्हायचा आहे. पण उमेदवारी न मिळाल्यानं, कार्यकर्ते आमनेसामने आले. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नाना काटेंना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. आणि बंडखोरी करत त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन झालं. त्यावेळी कार्यकर्ते आमनेसामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली.

चिंचवडमध्ये आता लढत फिक्स झालीय. भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नाना काटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे उमेदवारीसाठी आघाडीवर होते. पण अजित पवारांनी सोमवारी रात्रीच चिंचवडमध्ये बैठक घेतली. आणि सकाळी नाना काटेंना लॉटरी लागली.

अजित पवार 5 किलोमीटरच्या पदयात्रेत सहभागी

नाना काटेंचा अर्ज दाखल करण्यासाठीही अजित पवार चिंचवडमध्ये आले. जवळपास 5 किलोमीटरच्या पदयात्रेत अजित पवार पायी चालले आणि काटेंचा अर्ज भरला.तर उमेदवारी न मिळाल्यानं राहुल कलाटेंनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला.

बंडखोरी राष्ट्रवादीला ठरु शकते डोकेदुखी

विशेष म्हणजे 2019 मध्ये राहुल कलाटेंनाच राष्ट्रवादीनं चिंचवडमध्ये पुरस्कृत केलं होतं. पण यावेळी अजित पवारांनी नाना काटेंवर विश्वास टाकलाय. पण राहुल कलाटेंची बंडखोरी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरु शकते.

कसब्यातही बंडखोरी

राष्ट्रवादीतच बंडखोरी झाली असं नाही. तर कसब्यातही काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय. बाळासाहेब दाभेकरांनी अपक्ष अर्ज दाखल केला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवर सवाल उपस्थित करत पक्षानं अन्याय केल्यानं दाभेकरांनी काँग्रेसलाच आव्हान दिलंय.

भाजपची जोरदार रणनीती

इकडे भाजपबद्दल बोलायचं झालं तर, कसब्यात जिंकण्यासाठी भाजपनं खास रणनीती आखलीय. पुण्यात भाजपनं आपल्या 99 नगरसेवकांवर खास जबाबदारी सोपवलीय.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक नगरसेवकांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यातील नगरसेवकांचा विचार केला तर 2019 मध्ये भाजपचे 99 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 44, काँग्रेसचे 9 शिवसेनेचे 9, मनसे 2, एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला होता. म्हणजेच भाजपच्या नेत्यांची फौज आणि कार्यकर्त्यांबरोबरच कसब्याकडे भाजपचे 99 नगरसेवकही कामाला लागतील.

कसबा असो की चिंचवड, दोन्ही पोटनिवडणुकीत थेट लढत भाजप विरुद्ध मविआ अशीच आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बंडखोरीमुळं टेन्शन वाढलंय. 10 तारखेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळं आधी बंडोबांना शांत करण्याचं आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर आहे.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.