कसबा पेठमध्ये मोठ्या घडामोडी बाकी? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातल्या कसब्यात (Kasba Peth by election) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी थेट लढत होणार आहे.

कसबा पेठमध्ये मोठ्या घडामोडी बाकी? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 12:09 AM

पुणे : पुण्यातल्या कसब्यात (Kasba Peth by election) भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी थेट लढत होणार आहे. पण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे (BJP) शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न सुरुच राहणार असल्याचं दिसतंय. त्यातच भाजपकडून हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) अर्ज दाखल झाला असला, तरी मोठा ट्विस्ट येऊ शकतो. कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा पेठमधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत होतेय. मानाच्या कसबा गणपतीची आरती करुन, हेमंत रासनेंनी, बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं.

मात्र अर्ज दाखल करताना मुक्ता टिळकांच्या घरातील कोणताही सदस्य हजर नव्हता. ना शैलेश टिळक हजर राहिले ना कुणाल टिळक. त्यामुळे हीच चर्चा पुण्यात रंगली.

इकडे चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांनीही उमेदवारी अर्ज भरला. आणि आपल्या विजयाचा दावा केला. पण अद्याप राष्ट्रवादीनं उमेदवारच घोषित केलेला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे.

निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न

दुसरीकडे ही निवडणूक अजूनही बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या विनंती माध्यमांमधूनच सुरु असून प्रत्यक्ष कोणीही भेटलं नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. त्यावर प्रत्यक्ष भेटण्याची तयारी चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवलीय.

उमेदवारी अर्ज दाखल झालेत. 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मात्र बिनविरोध होईल असं वाटत नाही.

कसब्यातून मुक्ता टिळकांच्या घरात जर उमेदवारी दिली असती तर विचार केला असता असं, पटोले म्हणालेत. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केलाय.

इकडे उद्धव ठाकरेंनीही नाना पटोलेंना फोन केल्याची माहिती आहे. कसबा, चिंचवडमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. सर्व शिवसैनिक कामाला लागती, असा विश्वास ठाकरेंनी पटोलेंसमोर व्यक्त केलाय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बॉडीलेग्वेंज पाहता, अर्ज मागे घेणार नाही असंच दिसतंय. त्यामुळं भाजपसमोर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.