पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यापाठोपाठ रवींद्र धंगेकर यांची तयारी

Pune Lok Sabha Election : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. आता फायनल काही महिन्यात होणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. पुणे काँग्रेसकडून मोहन जोशी यांचे नाव चर्चेत असताना रवींद्र धंगेकर यांनीही तयारी दर्शवली आहे.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यापाठोपाठ रवींद्र धंगेकर यांची तयारी
mohan joshi and ravindra dhangekarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 12:00 PM

अभिजित पोते, पुणे | 5 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. या निवडणुनंतर आता विविध पक्ष फायनल म्हणजे लोकसभेच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चर्चा सुरु झाली आहे. तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणारे काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर्स लागले होते. एकीकडे काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही लोकसभेची तयारी दर्शवली आहे. मोहन जोशी यांना आमचा पाठिंबा आहे. परंतु पक्षाने आपणास संधी दिली तर आपणही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. मी लढवय्या आहे, पक्षाने संधी दिली तर कुठलीही निवडणूक लढण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संजीव ठाकूर यांना अटक झाली पाहिजे

ललित पाटील प्रकरणासंदर्भात बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, गेल्या 2 महिन्यांत या प्रकरणासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. पत्रव्यवहार केला. पोलिसांनी आम्हाला शब्द दिला होता की, कारवाई नक्की करू. त्या अनुषंगाने आता कारवाई सुरू आहे. मात्र, अजून संजीव ठाकूर यांना अटक करून कारवाई झालेली नाही. पोलिसांचा तपास संजीव ठाकूर यांच्यापर्यंत नक्की पोहचणार आहे. त्यांच्यावर कारवाई होईलच पण त्यांना मदत करणारे मंत्री आणि आमदार यांची नावे अजून समोर आली नाहीत, यासंदर्भात देखील चौकशी व्हावी, असे धंगेकर यांनी म्हटले.

प्रकरण मंत्र्यांपर्यंत जाणार

हिवाळी अधिवेशनात या सगळ्या प्रकरणावर आपण आवाज उठवणार आहोत. तसे आंदोलनही करणार आहोत. सत्तेत असणाऱ्या मंत्री आणि आमदारांनी ललित पाटील याला पाठबळ दिले. त्याला मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजीव ठाकूर याला ज्यांनी फोन केला त्याला अटक झाली पाहिजे.

हे सुद्धा वाचा

भिडे वाड्यात स्मारक होणार

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाय रचला. त्यांच्या त्या जागी आता स्मारक होत आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद म्हटले पाहिजे. भिडे वाड्यावर पुणे महापालिकेने ताबा मिळवला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. देशाला दूरदृष्टी देण्याचे काम या स्मारकातून होईल, ही अपेक्षा आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.