AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro | भोसरी मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याची कोणी केली मागणी? काय हवे नवीन नाव?

Pune News | पुणे शहरातील मेट्रो चांगलीच यशस्वी झाली आहे. पुणेकरांना या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळाला आहे. आता पुणे मेट्रोच्या भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. हे मागणी कोणी केली आहे?

Pune Metro | भोसरी मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याची कोणी केली मागणी? काय हवे नवीन नाव?
| Updated on: Oct 02, 2023 | 3:59 PM
Share

पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवात विक्रमी प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. आता मेट्रोच्या मार्गावर असलेल्या भोसरी मेट्रो स्टेशनच नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी जनतेतून झाली नाही तर महामेट्रोनेच केली आहे. महामेट्रोने पुढे जाऊन केंद्रीय मंत्रालयाकडे पत्र लिहिले आहे. पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशन आहे. परंतु मेट्रो स्टेशनपासून भोसरी पाच किलोमीटरवर आहे. स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या भागाला नाशिक फाटा नावाने ओळखले जाते. भोसरी या ठिकाणाहून पाच किलोमीटर दूर असल्यामुळे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

महारेराकडून विकासकांना नोटीस

सर्वसामान्यांची घर घेताना फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजे महारेराची स्थापना करण्यात आली. महारेराने केलेल्या नियमांचे उल्लंघन प्रकरणात ७४ विकासकांना नोटीस देण्यात आली. त्यातील 25 प्रकरणांची सुनावणी झाली असून सहा जणांना प्रत्येक दोन लाख रुपयांचा दंड करण्यात आला. गृहप्रकल्पांची जाहिरात देताना क्यूआर कोड प्रसिद्ध केला नसल्याने ही कारवाई झाली. उर्वरित प्रकरणात सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अन्य 33 विकासकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुरंदर विमानतळासाठी हालचाली

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दसऱ्यापासून भूसंपादन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास मिळाले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरंदर विमानतळासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. आता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी 5 हजार कोटी रुपये लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना होणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल होणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 8 हजार 175 मतदान केंद्र आहेत.

डोळ्यांच्या आजाराची साथ ओसरली

राज्यात डोळ्यांच्या आजाराची साथ ओसरली आहे. आतापर्यंत राज्यातील 5 लाख लोकांना डोळे येवून गेले आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे. पुणे जिल्ह्यातील 56 हजार जणांचे डोळे आले होते. आता राज्यातील साथ ओसरली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.