AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : पुणे मेट्रो झाली सुरु, काय आहेत तिकीट दर अन् वेळा, सवलती कोणाला मिळणार?

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरु झाली आहे. पुणेकरांना मेट्रोमधून सवलतसुद्धा मिळणार आहे. तसेच विद्यार्थी सवलतीसाठी पात्र असतील.

Pune Metro : पुणे मेट्रो झाली सुरु, काय आहेत तिकीट दर अन् वेळा, सवलती कोणाला मिळणार?
| Updated on: Aug 03, 2023 | 9:05 AM
Share

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्य पुणेकरांसाठी सुरु झाली. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. पिंपरी चिंचवडवरुन २५ ते ३० मिनिटांत पुणे शहरात नागरिकांना येता येणार आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांचा आता वाहतूक कोडींतूनही सुटका होणार आहे.

काय आहेत वेळा

  • सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत.
  • गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
  • 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.

तिकीट कसे मिळणार

प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी तिकीट रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळेल. स्थानकावर तिकीट व्हेडिंग मशीन आहेत. त्याद्वारे डेबिट किंवा क्रेडीट कार्डच्या माध्यमातून तिकीट मिळणार आहे. मेट्रोचे महाकार्ड किंवा पुणे मेट्रोच्या ॲपमधून तिकीट घेता येईल. ज्यांना व्हॉट्सॲपवरुन तिकीट हवे असेल त्यांनी 9420101990 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. या क्रमांकावर hi मेसेज केल्यावर तिकीट पर्याय येईल. त्यानंतर पेमेंट केल्यावर क्यूआर कोड मिळेल.

पुणे मेट्रोचे तिकीट दर

  • वनाझ ते रूबी हॉल ₹25
  • पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30
  • वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35
  • रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30
  • वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20
  • पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30
  • पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत
  • शनिवार रविवार सर्वांना ₹30% सवलत

हे आहेत वैशिष्टये

  • पुणे शहरातील पाहिले वाहिले भूमिगत मेट्रो स्थानक शिवाजी नगर मेट्रो स्टेशन आहे.
  • शिवाजी नगर मेट्रो स्टेशनला इतिहासाची साक्ष देणार करण्यात आले आहे.
  • पुण्यातील मेट्रो स्थानकावर शिवकालीन इतिहास साकारला गेला आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि पुणे शहराच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थानक तयार केले गेले आहे.
  • शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची खोली जमिनीच्या 108 फूट खाली (33.1 मीटर) एवढी आहे. यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.