वसंत मोरे मनसे अध्यक्षांच्या भेटीला, राज ठाकरे यांच्या मोलाच्या सूचना, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची मुंबईत भेट झालीय. या भेटीत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना मोलाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी वसंत मोरे आणि राज ठाकरे यांची भेट घडून आली आहे.

वसंत मोरे मनसे अध्यक्षांच्या भेटीला, राज ठाकरे यांच्या मोलाच्या सूचना, नेमकं काय घडतंय?
vasant moreImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 8:11 PM

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पुन्हा कामाला लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कामाला लागले आहेत. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणी करत आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामाला सुरुवात करा, अशा सूचना दिल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिलीय. मुंबईत या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. यावेळी राज ठाकरेंनी मोरेंना कामाला लागण्याची सूचना केली.

राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर

विशेष म्हणजे राज ठाकरे उद्या पुण्यात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. फक्त लोकसभाच नाही तर महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित ठाकरे पनवेल ते राजापूर पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेत पुण्यातील मनसेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे उद्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, राज ठाकरे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरे उद्या पुण्यात दोन विवाह सोहळ्यांना हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा गेल्या आठवड्यातच पुणे दौरा झाला होता. त्यानंतर ते उद्या पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे उद्या खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते उद्या दुपारनंतर पुण्यात येतील. या दरम्यान ते पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.