Rajya Sabha Election Results 2022 : …तरीही विजय मिळाला नाही, तुम्हाला आत्मचिंतनाची गरज; पुण्यातले मनसे नेते योगेश खैरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा

महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झाला. शिवसेनेचे संजय पवार यांना धनंजय महाडिकांनी पराभूत केले. दुसरीकडे अपक्षांचा पाठिंबा घेऊन छत्रपती घराण्याला नको त्या अटी घातल्या, असा आरोप योगेश खैरेंनी केला.

Rajya Sabha Election Results 2022 : ...तरीही विजय मिळाला नाही, तुम्हाला आत्मचिंतनाची गरज; पुण्यातले मनसे नेते योगेश खैरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा
राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर टीका करताना मनसे नेते योगेश खैरे
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 11, 2022 | 12:49 PM

पुणे : संभाजीनगरमध्ये एमआयएमची स्क्रिप्ट वाचली. त्यांच्या नाकदुऱ्या काढून त्यांची मते मिळवली, असा आरोप मनसे नेते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीवरून मनसेने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. योगेश खैरे म्हणाले, की शिवसेनेने एमआयएम (MIM) तसेच सपासारख्या हिंदुत्वविरोधी पक्षांशी हातमिळवणी केली. मात्र एवढे करूनही विजय मिळालाच नाही. निवडणुकीत विजय-पराजय होतच असतात. मात्र एका निवडणुकीसाठी आपल्या तत्वांना आणि विचारांना किती तिलांजली द्यायची, याच्या सर्व मर्यादा शिवसेनेने (Shivsena) पार केल्या. एका राज्यसभा जागेसाठी आपण काय पणाला लावत आहोत, याचे भान ठेवायला पाहिजे होते, अशी टीका योगेश खैरे यांनी शिवसेनेवर केली. औरंगाबादच्या नामांतरावरूनही खैरे यांनी शिवसेना तसेच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

‘नको त्या अटी मान्य केल्या’

महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झाला. शिवसेनेचे संजय पवार यांना धनंजय महाडिकांनी पराभूत केले. दुसरीकडे अपक्षांचा पाठिंबा घेऊन छत्रपती घराण्याला नको त्या अटी घातल्या. तर दोन-चार मते मिळवण्यासाठी समाजपादी पार्टी, एमआयएम यांच्या अटी मान्य केल्या. मात्र तरीही तुम्हाला विजय मिळाला नाही. औरंगाबादच्या सभेत एमआयएम तसेच सपाविषयी एक शब्दही काढला नाही. का तर पुढे राज्यसभेची निवडणूक होती, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच हे सर्व करून काय मिळवले, याचे आत्मचिंतन करण्याची शिवसेना पक्षाला गरज आहे, असे खैरे म्हणाले.

आत्मचिंतनाची गरज

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. सहावा उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या संजय पवार यांचा धनंजय महाडिक यांनी पराभव केला. पवार यांना केवळ 33 मते पडली. तर संख्याबळ नसतानाही महाडिक यांना 41 मते पडली. अपक्ष फुटल्याने हा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांनी काही अपक्ष आपल्या बाजूने वळते केले, त्यामुळे भाजपाच्या पारड्यात विजय पडला. आता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेसह शिवसेनेतील काही नेतेदेखील आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त करीत आहेत.