AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : शरद पवारांना जर अफझल खान सुफी संत वाटत असेल तर काय बोलावं? राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा पवार

राज ठाकरे पुढे म्हणाले की, कोणी कोणाला भेटतंय. शिवसेनेतील कोण म्हणालं की आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार जाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्याचत्या मशिदीसाठी फंडिग येतं.

Raj Thackeray : शरद पवारांना जर अफझल खान सुफी संत वाटत असेल तर काय बोलावं? राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा पवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
| Updated on: May 22, 2022 | 2:08 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेमध्ये चाैफेर फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांच्या निशाण्यावर महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार (Sharad Pawar) देखील होते. राज ठाकरे बोलताना म्हणाले की, पवारांना औरंगजेब सुफी संतच वाटत असेल तर काय बोलायचं. सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला.

राज ठाकरे यांच्या निशाण्यावर शरद पवार

पुढे राज ठाकरे म्हणाले की, हे प्रत्येकवेळेला तुम्हाला गृहित धरणार आहेत. कोणी कोणाला भेटतंय. शिवसेनेतील कोण म्हणालं की आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार झाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्याच्या मशिदीसाठी फंडिग येतं, कोण आहेत या औलादी. कुठून येतात पैसे आम्ही शांत आहोत.

महाविकास आघाडीवर टिका

पवार साहेब सांगताय आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री शिवसेनाप्रमुखांसोबत जेवायचो. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढीही अक्कल नाहीये तुम्ही कुणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे सत्तेत इकते मश्गूल आहेत की, त्यांनी कशाची पर्वा नाही. कारण जनता बेपर्वा आहे. लोक विसरतात आणि भलत्या गोष्टीवर मतदान होतात. आम्ही काहीही केलं तरी निवडून येतो. हे त्यांना वाटतं. हे बदलल्याशिवाय काहीच होणार नाही. एकंदरीतच राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...