पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे संदर्भात न्यायालयात याचिका, वाहनधारकांना दिलासा मिळणार का?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 18 टक्के टोल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत टोलमध्ये वाढ करण्याच्या निर्णयास आव्हान दिले गेले आहे. यामुळे वाहनधारकांचे लक्ष आता याचिकेकडे लागलेय.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे संदर्भात न्यायालयात याचिका, वाहनधारकांना दिलासा मिळणार का?
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 8:03 AM

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. आता या मार्गावरील टोल वाढणार आहे. येत्या 1 एप्रिलापासून प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जातात आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु या दरवाढीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरील निर्णयाकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयात कधी होणार सुनावणी

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गाच्या टोल मध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय टोल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचे ठरले होते. कंत्राटदारचा खर्च निघून गेल्या सव्वातीन वर्षात 70 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यानंतरही दरवाढ करण्यात येत आहे. या संदर्भात जनहित याचिका हायकोर्टात प्रलंबित आहेत. यावर आता 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यामुळे सर्व वाहन धारकांचे लक्ष या याचिकेकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचा

किती वाढले दर

चार चाकी वाहन

सध्याचे दर 270 एप्रिल 2023 पासून नवीन दर 320

टेम्पो

सध्याचे दर 430 एप्रिल 2023 पासून नवीन दर 495

ट्रक

सध्याचे दर 580 एप्रिल 2023 पासून नवीन दर 685

बस

सध्याचे दर-797 एप्रिल 2023 पासून नवीन दर 940

थ्री एक्सल वाहन

सध्याचे दर-1380 एप्रिल 2023 पासून नवीन दर 1630

एम एक्सल वाहन

सध्याचे दर-1835 एप्रिल 2023 पासून नवीन दर 2165

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 18 टक्के टोल दरवाढ ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक (Mumbai Pune Express Way Toll rate Increases) आहे, असे वाहन धारकांकडून म्हटले जात आहे. यामुळे यासंदर्भात याचिका दाखल झाली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खेड शिवापूर टोलबाबत मोठा निर्णय, कोण जिंकले? प्रशासक की आंदोलक?…वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.