पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

पुण्यात आत्तापर्यंत नाल्यांची आणि पावसाळी गटारांअवघी 8 टक्के स्वच्छता झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यंदा नालेसफाईसाठी लवकर निविदा मागविण्यात आल्या होत्या.

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता
नालेसफाई (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:06 PM

पुणे : पावसाळ्यात शहरात नाल्यांमध्ये पाणी तुंबू नये, रस्त्यावरचे पाणी लगेच वाहून जावे, यासाठी महापालिकेने (PMC) नालेसफाई आणि पावसाळी गटारांची सफाई सुरू केली आहे. ची आत्तापर्यंत नाल्यांची आणि पावसाळी गटारांअवघी 8 टक्के स्वच्छता झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यंदा नालेसफाईसाठी लवकर निविदा मागविण्यात आल्या होत्या. तर दोन आठवड्यांपूर्वी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या (Regional office) अंतर्गत एक नाले सफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता अशा दोन निविदा (Tender) मंजूर केल्या आहेत. आता काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठते तर काही ठिकाणे धोकादायकही आहेत. त्यावर महापालिका काम करत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ होतील, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले आहे.

76 धोकादायक ठिकाणे

शहरातील नाल्यांमध्ये 76 धोकादायक ठिकाणे असून, त्यापैकी 14 ठिकाणांची स्वच्छता झाली आहे. शहरात 373 कल्व्हर्टपैकी रोज सहा कल्व्हर्ट साफ केले जात आहेत. आतापर्यंत 47 कल्व्हर्टची सफाई झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गटारांचे एकूण 8.23 टक्के झाले काम

पावसाळी गटरांची एकूण लांबी 3 लाख 25 हजार 262 मीटर इतकी असून, त्यापैकी 26 हजार 768 रनिंग मीटर गटारांची स्वच्छता झाली आहे. तर 55 हजार 300 चेंबर्सपैकी 6 हजार 361 चेंबर स्वच्छ झाले आहेत. अद्याप 48 हजार 939 चेंबर्सचे बाकी आहे. पावसाळी गटारांची एकूण काम 8.23 टक्के तर चेंबर्स स्वच्छतेचे काम 11.50 टक्के इतके झाले आहे. शहरात 22 हजार 151 मीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी 1 हजार 719 मिटर नाल्यांची स्वच्छता झाली आहे.

आणखी वाचा :

Pune fire incident : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाट्याजवळ ट्रक जळून खाक; कागदामुळे भडकली आग

Ed action : ईडीनं जप्त केली पुण्यातल्या ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटीच्या मालमत्ता

Pune IMD : काहीसं दिलासादायक; एप्रिलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त थंड पुणे, काय म्हणतोय IMDचा डेटा?

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.