महाराष्ट्रातून सुरु होणार स्लीपर वंदे भारत, प्रवाशांना मिळणार या सुविधा
नागपूर-पुणे मार्गावर कधीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेन यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु प्रस्ताव तयार झाला आहे. या ट्रेनमुळे नागपूर ते पुणे प्रवास कमी वेळेत अधिक दर्जेदार होणार आहे. तसेच ट्रेनचा शेड्यूल आणि स्टॉपेज अजून निश्चित केले गेले नाही.

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विविध सुविधा सुरु केल्या आहेत. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यामुळे विविध मार्गांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर येणार आहे. नागपूर ते पुणे दरम्यान लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे. या संदर्भात हालचाली वेगाने सुरु आहे. नागपूर-पुणे मार्गावर गरीब रथ, अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेस ट्रेन सुरु आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यामुळे आता या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरातून थेट ट्रेन मिळणार
नागपूर-पुणे मार्गावर प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. यामुळे अनेकांना आरक्षण मिळत नाही. आरक्षण न मिळाल्यामुळे खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो. परंतु आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या मार्गावर आणखी एक गाडी सुरु होणार आहे. सध्या नागपूरवरुन बिलासपूर आणि नागपूर-इंदूर मार्गावर वंदे भारत ट्रेन आहे. परंतु ही ट्रेन चेअर कार आहे. पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन नाही. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला थांबते.
स्लीपर वंदे भारताची विशेषता काय?
स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये कुशन असणारे स्लीपर बर्थ असणार आहेत. तसेच स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये दर्जेदार नॉइज कँन्सलेशन टेक्नोलॉजी आहे. मोबाइल चार्जिंगसाठी चांगली सुविधा आहे. कोचमध्ये सेन्सर असणारे लाईट असतील. हे लाईट कोण असेल तर चालू होईल, अन्यथा बंद राहतील.
या ठिकाणी कोचची निर्मिती
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML) आणि इंटीग्रल कोच फॅक्ट्री (ICF) स्लीपर वंदे भारत कोचची निर्मिती करत आहे. या ट्रेनमध्ये स्वंचालित दरवाजे असणार आहे. तसेच प्रत्येक कोचमध्ये छोटी पॅन्ट्री असणार आहे. नागपूर-पुणे मार्गावर कधीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेन यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु प्रस्ताव तयार झाला आहे. या ट्रेनमुळे नागपूर ते पुणे प्रवास कमी वेळेत अधिक दर्जेदार होणार आहे. तसेच ट्रेनचा शेड्यूल आणि स्टॉपेज अजून निश्चित केले गेले नाही.
