बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभा लढत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये ही लढत होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलंय. भाजपने घरात भांडणं लावली आहेत. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष लावला. आधी 70 हजार कोटींचा आरोप केला. नंतर अजितदादांना मंत्री मंडळात घेतलं. भाजप जे करत आहे, ती राज्याची संस्कृती नाही. हे भाजपला महागात पडेल, असं नाना पटोले म्हणाले.
अजित पवार यांच्याबद्दल काय बोलावं मला कळत नाही. माझं टार्गेट भाजप आहे. नरेंद्र मोदींची राज्यातील भाषणं बघा पाण्यावर शेतीवर ते काहीच बोलत नाहीत. प्रधानमंत्री शेतकरी आत्महत्या यावर बोलतच नाहीत. जे लोक सोबत आहेत. त्यांच्या कारखाना पाहिला आणि 200 कोटी रुपये देण्यात आले. इतरांवर मात्र कारवाई केली, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
काँग्रेसने जी गॅरंटी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि मोहन भागवत यांना त्रास होत आहे. आगपाखड त्यांची सूर झाला आहे. देशाला सगळ्या गोष्टी दिसत आहे. भाजप आरक्षण विरोध आहे हे कळत आहे. मोदींनी आमच्या भगिनींच्या मंगळसुत्राचा मुद्दा काढला. आम्ही जातीय जनगणना करू आरक्षण देऊ. प्रत्येक समाजला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. भाजप खालच्या पातळीवर जात राजकारण करत आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकणार आहे. राज्यात आमच्या बाजूने वातावरण आम्ही दिलेल्या जाहीरनामा लोकांनी मान्यता दिली आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. राज्यात चित्र स्पष्ट आहे. पुण्यात देखील बदल होईल. सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघडी जिंकेल. ही निवडणूक मुस्लिम किंवा हिंदूंची नाही. देशाची निवडणूक आहे. संविधान वाचवण्याची आहे. आम्हाला हा वाद करायचा नाही, असं नाना पटोले म्हणाले.