AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात नवले पुलावर टँकरने 47 वाहनांना उडवले, ब्रेक निकामी भीषण अपघात

ब्रेक निकामी झाल्याने पुण्यातील नवले पुलावर एका भरधाव टँकरने 47 वाहनांना उडवले आहे. भरधाव टँकरने अनेक गाड्यांना उडवले असल्याने अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

पुण्यात नवले पुलावर टँकरने 47 वाहनांना उडवले, ब्रेक निकामी भीषण अपघात
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 20, 2022 | 10:06 PM
Share

पुणेः पुण्यातील नवले ब्रिजवर आज पुन्हा एकदा भरधाव टँकरने 30 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. टँकरने अनेक वाहनांना धडक दिली असल्यान अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. नवले पुलावर याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत.

ज्या ज्यावेळी अपघात झाले आहेत,त्यावेळी प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत.

आजही भीषण अपघात झाला असून यामध्ये अजून किती लोक जखमी आहेत त्याची माहिती अजून उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळी या पुलावर प्रचंड गर्दी असते.

या गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक देत वाहनांचे प्रचंड नुकसान केले आहे.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अजून तरी जखमींचा आकडा समजला नाही. मात्र अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना नवले रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती समजताचा घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी करण्यात आली. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?