AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune NCP : शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, अजित पवारांना लिहिले पत्र, काय केला आरोप

NCP Deepak Mankar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यासोबत त्यांनी एक पत्र ही लिहिलं आहे. त्यात त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Pune NCP : शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, अजित पवारांना लिहिले पत्र, काय केला आरोप
अजित पवार दीपक मानकरImage Credit source: गुगल
| Updated on: May 14, 2025 | 8:52 AM
Share

पुण्यातील शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. आपली बदनामी झाल्याचा आरोप करत आणि राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. त्यासोबत त्यांनी एक पत्र ही लिहिलं आहे. त्यात त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सत्यता न पडताळताच हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मानकर यांनी केला होता.

मानकर यांच्या राजीनाम्यात नेमकं काय लिहिले आहे?

“काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणार्‍या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही.

या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेविरोधात पुणे पोलिसांनी महिलांच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणात कुकडेला अटक करण्यात आली. तर त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता, मानकर आणि कुकडे यांच्यात 1 कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली. तर मानकर यांनी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.