AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यामधून मोठी बातमी, संशयित दहशतवाद्यांविरोधात NIA ची मोठी कारवाई

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आधी पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अशातच NIAने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

पुण्यामधून मोठी बातमी, संशयित दहशतवाद्यांविरोधात NIA ची मोठी कारवाई
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 17, 2024 | 12:56 AM
Share

पुणे : पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन संशयित दहशतवादांना कोथरूड परिसरातून अटक केली होती. चौकशीवेळी त्यांनी घरात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं होतं. अशातच NIA ने संशयित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. संशयित असलेल्या आरोपींची मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. आरोपींनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती.

NIA कडून संशयित मोठी कारवाई

पुण्यातील कोंढवा परिसरातील एकूण 4 मालमत्ता NIA कडून जप्त करण्यात आल्या आहेत.  संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट देखील NIA कडून  जप्त केला आहे. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आलं आहे. मालमत्ता जप्त केली गेली म्हणजे एनआयएला आणखी काही मोठी माहिती मिळाली का हा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल