AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या यादीत नाव नाही, संन्यास घेणार का?; उदयनराजे यांचं सर्वात मोठं विधान काय?

लोकसभा निवडणुकांच्या आज तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. उमेदवारांना प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढता यावा म्हणून राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत नाव नाही, संन्यास घेणार का?; उदयनराजे यांचं सर्वात मोठं विधान काय?
udayanraje BhosaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2024 | 12:50 PM
Share

सातारा | 16 मार्च 2024 : भाजपच्या लोकसभेच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जुन्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. तर संधी मिळाल्याने अनेकांना आनंदही झाला आहे. मात्र, काही महत्त्वाच्या नेत्यांना भाजपने अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले हे त्यापैकी एक. उदयनराजे भोसले यांची अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत. उदयनराजे यांनी उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर लढावं अशी मागणी त्यांचे समर्थक करत आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलणं औचित्य ठरणार नाही. तीन पक्ष एकत्र आले आहेत. सीट वाटपात पुढे मागे होईल. प्रत्येकाला वाटतं जास्त सीट मिळाव्यात आणि ते रास्त आहे. त्यात चुकीचं नाहीये. जे काही होईल त्यानंतर बघू, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

माझ्याकडे तिकीट आहे

तुमचा पुढचा निर्णय काय असेल? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं, असं सांगतानाच माझ्याकडे तिकीट आहे. प्लेनचं आहे. बसचं आहे. रेल्वेचं आहे. पिक्चरचं आहे. बस आहे ना? बाकीच्यांच्या तिकीटाचं माहीत नाही. ते ठरवतील त्यावेळी बघू, असं उदयनराजे म्हणाले.

समर्थक नाराज

उदयनराजे भोसले यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं नाही. त्यामुळे उदयनराजे यांचे समर्थक नाराज झाले होते. उदयनराजे यांचे समर्थक काल शिवतीर्थावर जमले होते. यावेळी या समर्थकांनी भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला. उदयनराजे यांना निवडणुकीचं तिकीट दिलं पाहिजे, अशी मागणी करतानाच तिकीट मिळणार नसेल तर उदयनराजे यांनी स्वबळावर लढलं पाहिजे, अशी मागणी या समर्थकांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्ते उघडले नाही

उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. उदयनराजे यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा अजून दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. उदयनराजे यांना भाजपने पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं होतं. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. उदयनराजे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची दोन वर्ष बाकी आहेत. त्यामुळे भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार की नाही याबाबतचा सस्पेन्सही अजून कायम आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.