Pune PMPML | पुणे मेट्रोनंतर आता पीएमपीएमएलतर्फे पुणेकरांसाठी सवलत, असे मिळणार डिस्काऊंट

pune PMPML | पुणे मेट्रोने पुणेकरांसाठी सवलत योजना आणली आहे. पुणेकरांना शनिवार, रविवारी सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोची योजना आहे. आता पुणे बससाठी पुणेकरांना सवलत मिळणार आहे...

Pune PMPML | पुणे मेट्रोनंतर आता पीएमपीएमएलतर्फे पुणेकरांसाठी सवलत, असे मिळणार डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 9:40 AM

पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. पुणे शहरात मेट्रो प्रकल्प सुरु झाला आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे दोन मार्गही सुरु झाले आहे. त्यानंतर या मार्गांचा विस्तार होणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीसाठी बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे. आता पीएमपीएमएलने बसेमध्ये पुणेकरांना सवलत मिळणार आहे. तसेच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

काय आहे सवलत

खाजगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर जास्त व्हावा, यासाठी पुणे पीएमपीएमएलकडून प्रयत्न सुरु आहे. तसेच प्रदूषणाला आळा बसावा या हेतूने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बसेस भाडे तत्वावर दिली जाणार आहेत. आता पीएमपीएमएलतर्फे शनिवार आणि रविवार 25 टक्के सवलतीत बस मिळणार आहे. पीएमपी बसमध्ये 25 टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणाला मिळणार सवलत

प्रवासी नागरिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालये आणि खाजगी कंपन्यांना सवलतीत बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच लग्न समारंभ, सहल आणि इतर कार्यक्रमांकरीता भाडे तत्वावर बस दिली जाणार आहे. माफक दरामध्ये प्रासंगिक कराराने बससुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पीएमपीएमएलचे विश्वषचकसाठी नियोजन

क्रिकेट विश्वचषकाचा मॅच पाहायला जाण्यासाठी PMPL ची विशेष बससेवा असणार आहे. क्रिकेट सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ही विशेष बससेवा पुरवण्यात येणार आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेचे 5 सामने होणार आहेत. या स्पर्धेला जाण्याऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सुविधेसाठी पीएमपीएमएलने हा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दिवशी पीएमपीएमएलतर्फे विशेष बस सुविधा पुरविण्यात येणार आहे.

अशी असणार बससेवा

पीएमपीएमएलकडून गहूंजे स्टेडियमसाठी पुणे मनपा भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक बस स्थानकावरुन बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आणखी जादा बस सोडण्याची तयारी केली आहे. या बसेस तीनही स्थानकांवरून सोडण्यात येणार आहे.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.