पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

| Updated on: Aug 21, 2021 | 8:26 AM

Pune Police | त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ
Follow us on

पुणे: श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321व्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. परंतु, ब्राह्मण महासंघाकडून लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान 18 ऑगस्टला मिरवणूक काढण्यात आली.

त्यामुळे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दिक द्वंद्वामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातलं गेलं, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले होते. राज ठाकरे यांनीही शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या सगळ्यामुळे पुण्यातील राजकारण प्रचंड तापले आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली

मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा आलेख सातत्यानं कमी होताना दिसत आहे. दिवसभरात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही लक्षणीय घट पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरात नव्याने 182 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 91 हजार 444 वर गेली आहे.

पुणे शहरातील 216 कोरोनाबाधितांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला . त्यानंतर आतापर्यंत कोरोना रुग्णांवर उपचार होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 80 हजार 424 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 874 वर गेली आहे.

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर, राज यांच्यावर थेट ‘राष्ट्रद्रोहा’चा आरोप!

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल

पुरंदरे ते प्रबोधनकार, शरद पवार ते संभाजी ब्रिगेड, राज ठाकरेंचे 10 मोठे मुद्दे