Pune Sainath Babar : राज ठाकरेंची ब्लू प्रिंट सत्यात उतरवायचीय, मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा निर्धार!

पुण्यातील ब्लू प्रिंट सत्यात उतरवायची आहे. मागे 29 नगरसेवक होते. आता आम्ही दोघेच आहोत. पण आवाज मनसेचाच होतात. साहेबांच्या नजरेतून पुणे आपल्याला घडवायचं आहे, असे मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले.

Pune Sainath Babar : राज ठाकरेंची ब्लू प्रिंट सत्यात उतरवायचीय, मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा निर्धार!
मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 1:14 PM

पुणे : पुणे शहरातील बरेचसे प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही सोडवण्याचे काम केले. राज ठाकरेंनी ब्लू प्रिंट दाखवली. त्यातील अनेक छोटी कामे आम्ही करू. 167 नगरसेवकांपैकी दोनच नगरसेवकांचा आवाज होता, असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) म्हणाले. आगामी निवडणुका लक्षात घेता राज ठाकरेंच्या स्वप्नातले काम आम्ही करू. पुण्यात पाण्याची समस्या (Pune water problem) गंभीर झाली आहे. अनेकवर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना याचे गांभीर्य नाही. ते पुन्हा मते मागायला जनतेसमोर जातात, असा आरोप बाबर यांनी यावेळी केला. साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा प्रथमच होत आहे. त्याचा उल्लेख बाबर यांनी आपल्या भाषणात केला. शाखा अध्यक्ष ते नगरसेवक आणि गटनेता हे केवळ राज ठाकरेंमुळेच शक्य झालं, असेही ते म्हणाले.

‘लोक चालूही शकत नाही’

साईनाथ बाबर पुढे म्हणाले, की आम्हाला भाषणाची सवय कमी. पण दहा दहा केसेस घेणारे आम्ही. आम्ही काम करणारे लोक आहोत. संघटनेशी बांधील लोक आहोत. पुण्यात अनेक प्रश्न आहेत. आता भाजपाची सत्ता आहे. प्रशासन आहे. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. 2014पासून आजपर्यंत चोवीस तास पाणी दिलं नाही. पाणी देणार म्हणून टॅक्स वाढवला. 24 हजार कोटींचं कर्ज काढलं. पण पाणी नाही. वाहतुकीचा पुण्यात बोजवारा उडाला आहे. घरातील माणूस नोकरीसाठी निघाला तर त्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. मेट्रोच्या कामामुळे फुटपाथ खोदले. त्यामुळे लोक चालूही शकत नाही. या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एक सक्षम पर्याय आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले साईनाथ बाबर?

‘दोन नगरसेवक पण आवाज मनसेचाच’

पालिकेने 40 टक्के टॅक्स वाढवला. राज्य सरकारचा निर्णय येतो आणि टॅक्स वाढतो. मागच्या चार चार वर्षाचा टॅक्स वाढवून दिला. कोव्हिड काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अन् अचानक टॅक्स वाढवला. लोकांचा गळा दाबण्याचं काम सरकार करत आहे. विविध पक्ष येतात आणि भूलथाप देताता. पुणेकरांनी आता जागृत झालं पाहिजे. हे प्रश्न सोडवण्यासाठी मनसेला सत्तेत बसवलं पाहिजे. नाशिकमध्ये सीएसआर फंडातून लोकांचे प्रश्न सोडवले. तेच पुण्यात करायचं आहे. पुण्यातील ब्लू प्रिंट सत्यात उतरवायची आहे. मागे 29 नगरसेवक होते. आता आम्ही दोघेच आहोत. पण आवाज मनसेचाच होतात. साहेबांच्या नजरेतून पुणे आपल्याला घडवायचं आहे. मनसैनिक जीवाचं रान करत आहे. आमच्या कोअर कमिटीतही चर्चा होते. प्रत्येक विषयात आपण आंदोलन केलं पाहिजे. हीच चर्चा होते, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.