AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे पुन्हा हादरलं! सावत्र बापाकडून १० वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस अत्याचार

Pune crime news : पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावत्र बापाने 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

पुणे पुन्हा हादरलं! सावत्र बापाकडून १० वर्षांच्या मुलीवर सलग 2 दिवस अत्याचार
| Updated on: Jul 21, 2026 | 12:05 PM
Share

पुण्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील एका गावात पुन्हा भयंकर घडला आहे. बाहेर कामासाठी आलेल्या कुटुंबातील 30 वर्षीय सावत्र बापाने दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यात पुन्हा संतापजनक प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाी पीडित मुलीच्या आईने भोरच्या राजगड पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीमाहितीनुसार, भोरच्या तालुक्यातील एका गावात संबंधित कुटुंब बाहेरील जिल्ह्यातून कामासाठी आले होतं. आरोपीने 17 आणि 18 जुलैला आरोपीने मुलीवर अत्याचार केला आहे. नराधमाच्या अत्याचारानंतर मुलीला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यानंतर तिने हा प्रकार आईला सांगितला. आईने स्थानिक नागरिक आणि मुकादमाच्या मदतीने राजगड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यात साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नरामधाने पीडित मुलीची हत्या केली होती. या संतापजनक प्रकाराच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या प्रकरणात कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पायधुनीतही संतापजनक प्रकार घडला होता. एका 32 वर्षांच्या नराधमाने 7 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद केल्याची घटना घडली होती. वासनांध वॉचमनने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकारानंतर स्थानिकांनी वॉचमनला चोप दिला होता.या प्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...