ISIS सोबत सिमी अन् इंडियन मुजाहिदीन, पुणे दहशतवादी प्रकरणात मोठा खुलासा

Pune Crime News : पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांची काय योजना होती, यासंदर्भात तपास सुरक्षा संस्था करत आहेत. या दहशवाद्यांच्या प्रकरणात महत्वाचा खुलासा सुरक्षा संस्थांनी केला आहे.

ISIS सोबत सिमी अन् इंडियन मुजाहिदीन, पुणे दहशतवादी प्रकरणात मोठा खुलासा
terrorism (file photo) Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 10:30 AM

पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत असलेले इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे आरोपी होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातील एटीएसने केला आता एनआयएकडे हा तपास आला आहे. या दोघांचे इसिस असलेले संबंध आधीच उघड झाले होते. या प्रकरणात आरोपी शाहनवाज आलम हा मुख्य सूत्रधार असून तो नामशेष झालेल्या दहशतवादी संघटना सिमी अन् इंडियन मुजाहिदीनला पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे.

या संघटना पुन्हा एकत्र येणार

इस्लामिक स्टेट (आयएस) ही दहशवादी संघटना नाही तर अन्य दोन दहशतवादी संघटनांनाही पुन्हा एकत्र आल्या आहेत. स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटना पुन्हा सक्रीय होत असल्याची चिन्ह दिसून येत आहे. सुरक्षा संस्थांनी यासंदर्भात माहिती दिली.

हा आरोपी दुवा

राष्ट्रीय तपास संस्थेने ३ जुलै रोजी चार जणांना अटक केली होती. त्यात एक मुंबईतून, दोन ठाण्यातून तर एक पुणे शहरातील होते. हे सर्व जण इसिससाठी काम करत होते. या प्रकरणाचा संबंध हजारीबाग येथील प्रकरणाशी येत आहे. हजारीबाग येथील साकीब नचान हा मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता. त्याला दहा वर्षांचा शिक्षा झाली होती. तो या सर्व प्रकरणात महत्वाचा दुवा ठरत आहे.

हे सुद्धा वाचा

जुन्या संघटना पुन्हा सक्रीय

शाहनवाज आलम हा या प्रकरणात महत्वाचा खिलाडी आहे. ज्या संघटना जवळपास संपल्या होत्या, त्यांना पुन्हा सक्रीय करण्याचे काम तो करत आहे. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धुळ फेकत त्याने हे काम चालवले होते. परंतु आता तो पकडला गेला आहे.

सुरक्षा संस्थांचे असा आहे खुलासा

  • आरोपी उच्च शिक्षित असून त्यांनी आयटी, सायबर, विस्फोटक आणि इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइसचे प्रशिक्षण घेतले आहे.
  • एकत्र आलेल्या आरोपींमध्ये वैचारिक मतभेद होते, पण पुन्हा ते एकत्र आले. त्यासाठी सिमी आणि आयएमची भूमिका महत्वाची ठरली.
  • सिरीया आणि इराकमध्ये त्यांचे हँडलर आहेत.
  • पुणे प्रकरणात त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात फडिंग झाली. त्यांना नियमित विदेशातून फंड मिळत होता.
Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.