AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींना वेग; वसंत मोरे म्हणाले, त्या साहेबांना विचारा की…

Vasant More on Loksabha Election 2024 : आता माघार नाही...!; वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम... टीव्ही 9 मराठीशी बोलताना वसंत मोरे यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? कुठल्या पक्षात जाणार? लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीवर वसंत मोरे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींना वेग; वसंत मोरे म्हणाले, त्या साहेबांना विचारा की...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 21, 2024 | 1:09 PM
Share

अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 मार्च 2024 : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांची भूमिका काय असणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. यावरही वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे. पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत. त्यांना याबद्दल विचारा…, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.

वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम आहेत. मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू… पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडणून देत नाहीत, असं वसंत मोरे म्हणालेत.

निवडणूक तर लढणारच- मोरे

रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं. तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा!, असा निर्धार वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.

वसंत मोरे यांनी काही वेळा आधी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तरीपण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी… अशी एक पोस्ट त्यांनी सकाळी शेअर केली होती. त्यानंतर त्यांना आलेला एक अनुभव मोरे यांनी काही वेळाआधी शेअर केलाय.

वसंत मोरे यांचं ट्विट जसंच्या तसं

कुठपर्यंत पोहोचला राम राम गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो. दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो. त्यापैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिलं. मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो. ही घ्या तुमची बातमी… म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार …!

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा