Pune Weather | पुण्यात पावसाचं जोरदार पुनरागमन, सकाळपासून संततधार, पुढचे तीन-चार दिवस पावसाचा इशारा

पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.

Pune Weather | पुण्यात पावसाचं जोरदार पुनरागमन, सकाळपासून संततधार, पुढचे तीन-चार दिवस पावसाचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 9:18 AM

पुणे : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे. पुण्याचा पारा सरासरी 22 अंशापर्यंत खाली आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 17.3 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. (It has been raining continuously in Pune since this morning)

पुण्यात दिवसा 48 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पुण्यात अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे.

राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा

मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌लर्ट

मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आलाय. तर, 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.

बीडला पावसाने झोडपलं

मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

Aurangabad Rain : तुफान पावसाने तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून बाहेर काढलं

Maharashtra Rains : कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, दरड कोसळल्याने वाहने अडकली, जळगावात पूर

Jalgaon Rain | चाळीसगावात मुसळधार पाऊस, घरं-दुकानं पाण्याखाली

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.