AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : पुण्यातील नेहमी तुफान गर्दी होणाऱ्या खडकवासला धरणावर शुकशुकाट…. नेमकं काय कारणं!

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरणावर आज रंगपंचमी दिवशी तर तोबा गर्दी असणारच ना? मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल आज रविवार असतानाही एकदम शुकशुकाट पाहायला मिळाला.

Pune : पुण्यातील नेहमी तुफान गर्दी होणाऱ्या खडकवासला धरणावर शुकशुकाट.... नेमकं काय कारणं!
| Updated on: Mar 12, 2023 | 10:29 PM
Share

पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यामधील शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण सर्वांना माहित आहे. या धरणावर केव्हाही जा तिथे तुम्हाला कायम पर्यटकांची गर्दी असलेली पाहायला मिळते. धरण पाहायला लोकांना खाण्यासाठी तिथे अनेक खाद्यपदार्थांचे गाडे असतात. मात्र आज रविवारचा दिवस महत्त्वाचं म्हणजे रंगपंचमी दिवशी तर तोबा गर्दी असणारच ना? मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल आज रविवारी एकदम शुकशुकाट पाहायला मिळाला. आज असं काय होतं ज्यामुळे धरणावर अजिबात गर्दी झालेली नव्हती.

नेमकं काय आहे कारण? खडकवासला धरण पुणेकरांची तहान भागवतं जर धरणातील पाणीसाठा कमी झाला तर पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रंगपंचमीदिवशी सर्वजण आनंद घ्यायला आणि रंगपंचमी साजरी करायला अनेकजण धरणावर जायचा प्लॅन करतात. याचपार्श्वभूमीवर सामाजिक भान जपण्याच्या उद्देशाने धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने खडकवासला जलाशय रक्षण अभियान चालवलं होतं.

गेल्या 21 व्या वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती हे अभियान राबवत आहे. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. हिंदु जनजागृती समितीला पुणे पोलीस आणि पाटबंधारे विभागानेही मदत केल्याचं हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सांगितलं.

या अभियानाला पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले अश्या प्रकारे सहभागी होत हे अभियान यशस्वी केले. अशाच प्रकारे रंगपंचमी आणि धुलिवंदनला दरवर्षी अभियान राबवण्यात येतं.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.