Pune crime : दुचाकीचोरांचा पर्दाफाश; पुण्याच्या खेड पोलिसांनी 9 बाइक्ससह जप्त केला 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल

| Updated on: May 08, 2022 | 9:46 AM

दोन दिवसांपूर्वीच खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एक टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून 8 मोटारसायकल जप्त केल्या होत्या. एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एकूण खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील पाच गुन्हे उघडकीस आणले होते.

Pune crime : दुचाकीचोरांचा पर्दाफाश; पुण्याच्या खेड पोलिसांनी 9 बाइक्ससह जप्त केला 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल
दुचाकीचोरांचा खेड पोलिसांनी केला पर्दाफाश
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातील खेड पोलीस स्टेशनच्या (Khed Police) गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून यामधे 9 मोटारसायकलींसह दोन लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. यामधे 7 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली असून 3 आरोपींना अटक (Arrest) करण्यात आले आहे. त्यांचेकडून खेड, शिक्रापूर , चाकण, आळंदी, वडगाव मावळ व इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीचा नुकताच पर्दाफाश करण्यात आला होता. त्यापाठोपाठ लगेचच दुसऱ्या टोळीचाही खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केला पर्दाफाश केला आहे. एकूण 9 मोटारसायकलींसह 2 लाख 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 7 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

सात गुन्हे केले होते उघड

दोन दिवसांपूर्वीच खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एक टोळीचा पर्दाफाश करून त्यांच्याकडून 8 मोटारसायकल जप्त केल्या होत्या. एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एकूण खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील पाच गुन्हे उघडकीस आणले होते. त्यापाठोपाठ लगेचच दुसऱ्या देखील टोळीचा शोध घेवून त्यांच्याकडून एकूण 9 मोटारसायकलसह 2 लाख 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोनही टोळ्यांचा पर्दापाश केल्याने सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना लगाम लागणार आहे.

पोलीस पथकाची कारवाई

या दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख साो, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साो, पोलीस निरीक्षक सतिश गुरव सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप भारत भोसले, अंमलदार. स्वप्निल गाढवे, सचिन जतकर, निखील गिरीगोसावी, प्रवीण गैंगजे, होमगार्ड विजय होले, नंदू होले, अतिश शिंदे यांनी केली आहे.

अधिक तपासणीनंतर उघड होताहेत गुन्हे

अनेकवेळा नाकाबंदीच्या दरम्यान काही वाहनचालकांच्या संशयास्पदवर्तनावरून गुन्हे उघड होत आहेत. खेडच्या पाबळमध्ये हाच प्रकार घडला होता. विनानंबरच्या गाडीविषयी तपास केला असता, गाडी चोरीची असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी केलेले गुन्हे उघड झाले.