आजीबाईचा २१ वर्षांचा संघर्ष, एका फेसबूक लाईव्हने चुटकीसरशी सुटला प्रश्न, कसा ते वाचा

२००२३ पर्यंत पुष्पा राठोड यांनी पेन्शनच्या हक्कासाठी संघर्ष केला. पण, त्यांना पेन्शन मिळाली नाही.

आजीबाईचा २१ वर्षांचा संघर्ष, एका फेसबूक लाईव्हने चुटकीसरशी सुटला प्रश्न, कसा ते वाचा
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 2:45 PM

पुणे : पुष्पा राठोड वय ७३ वर्षे वय आहे. त्यांचे पती अरविंद राठोड यांनी मनपात ४० वर्षे सेवा दिली. २००२ साली राठोड सेवानिवृत्ती झाली. मनपाचे त्यांना पेन्शन दिली नाही. २००२ ते २०१३ अशी ११ वर्षे स्वतः राठोड यांनी स्वतःच्या पेन्शनसाठी संघर्ष केला. मनपाच्या वेगवेगळ्या विभागात पेन्शनसाठी जात होते. २०१३ साली अरविंद राठोड यांचे निधन झाले. अरविंद राठोड यांचा संघर्ष संपला. त्यानंतर २००२३ पर्यंत पुष्पा राठोड यांनी पेन्शनच्या हक्कासाठी संघर्ष केला. पण, त्यांना पेन्शन मिळाली नाही.

अधिकाऱ्यांशी साधला संपर्क

वयाच्या ७३ व्या वर्षी त्या फेसबूक पाहतात. वसंत मोरे यांचे फेसबुकच्या माध्यमातून काम पाहिलं. त्यानंतर माहिती घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी मनपामधून माहिती घेतली. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांना पुष्पा राठोड यांचा प्रश्न समजावून सांगितला.

एखाद्या सेवानिवृत्ती व्यक्तीला किती दिवस उंबरठे झिजवले, याची जाणीव करून दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. २१ वर्षांच्या पेन्शनचा फरक पुष्पा राठोड यांना मिळाला आहे. त्यानंतर पेन्शन लागू होणार आहे.

हे सुद्धा वाचा

वसंत मोरे यांचे फेसबूक लाईव्ह पाहिले

२०१३ ते २०२३ पर्यंत आजीची पेन्शन त्यांना देणार आहे. २१ वर्षे उंबरठे झिडवावे लागले. पण, वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचा संघर्ष कामी आला. कारण त्यांनी वसंत मोरे यांचे फेसबूक लाईव्ह पाहिले. त्यातून त्यांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. वसंत मोरे यांनी पाठपुरावा करून त्यांनी पेन्शन मिळवून देण्यात यश मिळवले. यात त्यांना मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी मदत केली.

२१ वर्षे करावा लागला संघर्ष

पेन्शनचा 2003 पासून रखडलेला फरक वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हने मिळवून दिला. 21 वर्ष संघर्ष करणाऱ्या आजीला दहा लाख 37 हजार 666 रुपयांचा धनादेश मिळाला. पुण्यातील अरविंद राठोड यांच्या पत्नी पुष्पा राठोड गेल्या दहा वर्षापासून सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत होत्या.

संघर्षाला विराम लागला

पुष्पा राठोड यांचे पती अरविंद राठोड यांनी पुणे मनपात ४० वर्षे सेवा प्रदान केली. पण, सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळाली नाही. त्यासाठी अरविंद यांनी महापालिकेविरोधात संघर्ष केला. पुष्पा राठोड यांचा हा संघर्ष मनपाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांचा संघर्ष चालू होता. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. यात वसंत मोरे यांच्या फेसबूक लाईव्हने महत्त्वाची भूमिका निभावली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.