AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune agitation| पुण्यातील सय्यदवाडीत नागरिकांचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध रेल रोको आंदोलन ; जाणून घ्या नेमकं कारण

पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने हे गेट बंद केले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून सुरु आहे. या गेटमधून दोन लाखून अधिक नागरिकांची दररोज जाण्यायेण्याची सोय होत होती. मात्र गेट बंद केल्यान नागरिकांना मोठ्या नागरिकांना सोईचा सामना करावा लागत आहे.

Pune agitation| पुण्यातील सय्यदवाडीत नागरिकांचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध रेल रोको आंदोलन ; जाणून घ्या नेमकं कारण
Pune Andolan
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 16, 2022 | 8:35 PM
Share

पुणे- दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करण्यास रोखून धरले. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

नागरिकांची होतेय गैरसोय पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने हे गेट बंद केले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून सुरु आहे. या गेटमधून दोन लाखून अधिक नागरिकांची दररोज जाण्यायेण्याची सोय होत होती. मात्र गेट बंद केल्यान नागरिकांना मोठ्या नागरिकांना सोईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

रिक्षा व्यवसायिकांना फटका या गेटमधून आसपासच्या बारा वाड्यामधील नागरिक ये-जा करतात. या परिसरातील स्थानिक नागरिक तसेच व्यवसायिक रिक्षा चालक यांनाही या गेटमधून वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात उपयोग होत होता. मात्र गेट बंद असल्याने त्याचा व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. हे गेट खुले न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. आंदोलनात यामध्ये माजी नगरसेवक फारुक इनामदार, नगरसेवक योगेश ससाने, डॉक्टर शंतनु ,जगदाळे कलेश्वर घुले,संजय शिंदे,सागर भोसले, अविनाश काळे, कबीर शेख, प्रणव राजे भोसले, अर्जुन सातव, बाळासाहेब ससाने, सुप्रिया इनामदार , महेश सातव, शितल सातव, मीनाताई थोरात ,वैष्णवी सातव, मंदाकिनी सुतार यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Ravi Rana | ‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची 10 हजारांकडे वाटचाल; जाणून घ्या आजची स्थिती

Virat Kohli Resigns : कर्णधार कोहलीचा सलग 7 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा, अनेक ‘विराट’ रेकॉर्ड्सना गवसणी

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?