AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : पावसाचा आज कुठे ऑरेंज अलर्ट, किती जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

IMD Weather forecast : राज्यात पावसाने दडी मारली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे.

Rain : पावसाचा आज कुठे ऑरेंज अलर्ट, किती जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
| Updated on: Aug 20, 2023 | 8:22 AM
Share

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतला आहे. राज्यातील अनेक भागांत आता श्रावण सरीचा अनुभव येत आहे. पाऊस मुसळधार नसला तरी रिमझिम स्वरुपात अनेक भागांत पडत आहे. विदर्भात पावसाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट काही जिल्ह्यांना दिला आहे. राज्यात २५ ऑगस्टपर्यंत पाऊस कायम असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत वसई, विरारमध्ये सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडत आहे.

कुठे कोणता अलर्ट

राज्यातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रविवारी दिला आहे. या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.

बंगालच्या उपसागरात बदल

उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरात बदल झाले आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.यामुळेच हिमाचल प्रदेशत सध्या अतिवृष्टी झाली आहे. आता मात्र हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे आला आहे. यामुळे राज्यात विदर्भात पाऊस सुरु झाला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र् आणि मराठवाडा या भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पुढील पाच दिवस पडतील, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत पाऊस

विदर्भात पाऊस सुरु असताना मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. वसई, विरारसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुंबईतील सातही तलावांत एकूण ८३.५१ टक्के जलसाठा आहे. यामुळे मुंबईची पाण्याची चिंता दूर झाली आहे.

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाचे सर्व 33 गेट उघडले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.