Raj Thackeray Speech : राज ठाकरे सरड्यासरखे रंग बदलतात, त्यांना नकलेशिवाय काय येतं? अजित पवारांचा खोचक सवाल

राज ठाकरेंचं पहिलं टार्गेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) होते. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पाहटेच्या शपथविधीचाही खरपूस समचार घेतला. एवढंच काय त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांनाही सोडलं नाही.

Raj Thackeray Speech : राज ठाकरे सरड्यासरखे रंग बदलतात, त्यांना नकलेशिवाय काय येतं? अजित पवारांचा खोचक सवाल
अजित पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 4:44 PM

पुणे : गुढी पाडव्याचा शनिवार राज ठाकरेंच्या भाषणाने (Raj Thackeray Speech) गाजवला. राज ठाकरेंचं पहिलं टार्गेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) होते. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पाहटेच्या शपथविधीचाही खरपूस समचार घेतला. एवढंच काय त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांनाही सोडलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांची नक्कलही केली. त्यावरूनच आता राज राज ठाकरेंवर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शनिवारी रात्रीपासूनच राज ठाकरेंवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीकाची झोड उडवली आहे. सर्वात आधी राज ठाकरेंचा जयंत पाटलांनी समाचार घेतला. सकाळपासूनही राज ठाकरेंवर तीव्र टीका होत आहे. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत राज ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.

अजित पवार काय म्हणाले?

राज ठाकरेंवर निशाणा साधताना अजित पवार म्हणतात, राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही. त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. तसेच केंद्र विरोधात मागे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरूनही त्यांनी टोलेबाजी केलीय. राज ठाकरे हे केवळ पलट्या मारतात, असेही अजित पवार म्हणाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर अक्कल दाढच काढली आहे. एवढ्याा लेट सरकार स्थापनेबाबत बोलायला कसं सुचलं? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे या भाषणाने राज्यातलं राजकारण जोरदार तापलं आहे. मात्र या सगळ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार पलटवारही केला आहे.

सदीप देशपांडे यांचा पलटवार

ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे, त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये, सध्या ते बिझी आहेत, अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत. त्यांचा हिशोब इडीला द्यायचाय, हजारो कोटी मनपाचे खाल्ले त्यांचा हिशोब द्यायचाय, राज साहेब जे बोलले ते झोबलेले दिसतंय, असे म्हणत त्यांनी पलटवार केलाय. तसेच राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी 9 वाजतोच. त्याला काय महत्व द्यायचं. शरद पवारांचा भोंगा वाजवणाऱ्यांना तेच दिसणार, राऊत पवारांचा भोंगा वाजवतात, अशी टीका त्यांनी केली आहे.तसेच बाळासाहेबांचे विचार ऊरले कुठे, राऊतांची मानसिक स्थिती ठिक नाही. आणि एनसीपीने आमच्या टिका टिपणीवर बोलण्याआधी आरश्यात पाहावे. यशवंतरावांच्या पाठीत खंजर खुपसला पुलोद स्थापन केली, 1990 मध्ये कांग्रेसशी फारकत केली मग त्यांच्यासोबत युतीत गेले, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या टीकेचाही समाचार घेतला आहे.

Sujat Ambedkar: ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?

विद्यार्थी लाभार्थ्यांना कच्चा धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणी

Inflation : युवासेनेचं राज्यव्यापी थाळी बजाव आंदोलन, रस्त्यावर भाकरी, पुतळ्याला जोडे, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.