राजर्षी शाहू महाराजांना देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे; रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

कोल्हापुरात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक ठरलेले राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत असे मतही रामदास आठवले यांनी मांडले.

राजर्षी शाहू महाराजांना देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे; रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन
रामदास आठवले यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादनImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:31 PM

मुंबई: लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj)यांच्या 100 व्या स्मृतीदिनी स्मृतीशताब्दीनिमित्त आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांनी 100 सेकंद स्तब्ध उभा राहून राजर्षी शाहू महाराजांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त दि. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कोल्हापुरात कृतज्ञ विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन कोल्हापूरात करण्यात आले होते. मात्र लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनी केवळ कोल्हापूरात (Kolhapur) नाही तर देशभर कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त भव्य कृतज्ञता समारोह तीन दिवसांचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षातर्फे कोल्हापुरात लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये परिसंवाद, मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

समतेची चळवळ रुजवली

राजर्षी शाहू महाराजांचे परिवर्तनाच्या समतेच्या चळवळीत मोठे योगदान असून शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक युगप्रवर्तक महापुरुष होते. त्यांनी माणगाव येथील परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे उद्गारकर्ते पुढारी होतील असे सांगितले होते.

आरक्षणाचे जनक

कोल्हापुरात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक ठरलेले राजर्षी शाहू महाराज हे बहुजनांचे प्रेरणास्थान आहेत असे मतही रामदास आठवले यांनी मांडले.

सामाजिक योगदानाविषयीही चर्चा

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त कृतज्ञता पर्वा आज ना.रामदास आठवले यांनी पुण्यात साजरे केले. यावेळी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या सामाजिक योगदानाविषयीही चर्चा करण्यात आली. कोल्हापूरात जी संकल्पना राबवण्यात आली, ती साऱ्या देशात राबवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

दूरदृष्टीकोनाचे निर्णय

राजर्षी शाहू महाराज यांनी समाजासाठी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय किती दूरदृष्टीकोन ठेऊन घेतले होते. त्यामुळेच शाहू महाराजांच्या विचार आजच्या काळातही तितकेच महत्वाचे ठरतात, आणि लागू पडतात असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.