pune university | पुणे विद्यापीठात रामलीला, असे काय दाखवले की प्राध्यपकासह सहा जणांना अटक

| Updated on: Feb 04, 2024 | 3:45 PM

pune university Pune News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आले. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते.

pune university | पुणे विद्यापीठात रामलीला, असे काय दाखवले की प्राध्यपकासह सहा जणांना अटक
Follow us on

अभिजित पोते, पुणे, दि.4 फेब्रुवारी 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास केला गेला. यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. या प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. या प्रकरणात ललित कला अकादमी उच्च न्यायालयात जाणार आहे.

नाटकात रामायणाचा विपर्यास

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या ललित कला अकादमीची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जेब वी मेट’ हे नाटक सुरू होते. त्यावेळी रामायणचा विपर्यास केल्याचा आरोपावरुन अभविपच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. तसेच नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आलेत. ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय.

काय होते नाटकात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आले. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

आता न्यायालयीन लढाई

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे ललित कला केंद्रातील विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार आहे. भावनिक वादातून गुन्हा दाखल केल्याचा दावा ललित कला अकादमीच्या वकिलांनी केला. विद्यार्थी आणि ललित कला अकादमीच्या प्रमुखांवर चुकीची कलम लावल्याची देखील वकिलांनी म्हटले आहे. या प्रकरणात कुलगुरू सुरेश गोसावी यांनी विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करण्याचे सांगितले.