AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात हंगामातील पहिली हापूसची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती?

hapus mango : खवय्यांनाच नव्हे तर सर्वांना आवडणारा हापूस आंबा पुणे बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात हापूसची पहिली पेटी महिन्याभरापूर्वीच आली आहे. पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये हा हापूस आला आहे. त्याला उच्चांकी दर मिळाला आहे.

पुण्यात हंगामातील पहिली हापूसची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती?
Hapus MangoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jan 18, 2024 | 12:50 PM
Share

पुणे, दि.18 जानेवारी 2024 | आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा त्याच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो. सक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे.

एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी

पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. त्या आंब्याची विधीवत पूजा आज करण्यात आली. यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. सध्या आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. यामुळे आब्याला फळांचा राजा म्हणतात. आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आली.

किती मिळाली किंमत

रत्नागिरीपासून 20 किलोमीटरवर असलेल्या पावस भागातील शेतकरी सुनील यांच्या शेतातील हे आंबे आहेत. मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर त्यांनी रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली. या आंब्याच्या पेटीची किंमत 21,000 रुपये होती. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करण्यात आला. त्यानंतर आब्याचा लिलाव झाला. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी 21 हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली. त्यामध्ये चार डझन आंबे आहेत.

कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूसची निर्यात होत असते. महिन्याभरापूर्वी पुण्यात देवगड आब्यांची पहिली पेटी विकली गेली होती. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील आंबा विकला गेला होता. त्यानंतर आता रत्नागिरी हापूस विकला गेला.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.