AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : भाड्यानं घर पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा बलात्कार; रिअल इस्टेट एजंटला पुण्याच्या विमानतळ पोलिसांनी केली अटक

केशभूषाकार म्हणून काम करणारी ही महिला एका वेबसाइटद्वारे 38 वर्षीय रिअल इस्टेट एजंटच्या संपर्कात आली. शुक्रवारी रात्री आरोपीने महिलेला घर पाहण्यासाठी बोलावले. जेव्हा ती महिला वाघोली परिसरात पोहोचली, तेव्हा आरोपीने फ्लॅटचा मालक येईपर्यंत वाट पाहण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या घरी नेले आणि अत्याचार केला.

Pune crime : भाड्यानं घर पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा बलात्कार; रिअल इस्टेट एजंटला पुण्याच्या विमानतळ पोलिसांनी केली अटक
बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2022 | 5:04 PM
Share

पुणे : 24 वर्षीय महिलेवर बलात्कार (Physical abuse) केल्याप्रकरणी एका रिअल इस्टेट एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिला भाड्याने घर पाहण्यासाठी गेली होती, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. ही घटना शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री घडली, असे विमानतळ पोलीस ठाण्यातील (Vimantal police station) अधिकाऱ्याने सांगितले. केशभूषाकार म्हणून काम करणारी ही महिला एका वेबसाइटद्वारे 38 वर्षीय रिअल इस्टेट एजंटच्या संपर्कात आली. एक आठवडाभर भाड्याने उपलब्ध फ्लॅटबद्दल मेसेजद्वारे (Message) त्याच्याशी संवाद साधला. शुक्रवारी रात्री आरोपीने महिलेला घर पाहण्यासाठी बोलावले. जेव्हा ती महिला वाघोली परिसरात पोहोचली, तेव्हा आरोपीने फ्लॅटचा मालक येईपर्यंत वाट पाहण्याच्या बहाण्याने तिला त्याच्या घरी नेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. तिथे तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला.

महिलेची वैद्यकीय तपासणी

जेव्हा ते आरोपीच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने कथितपणे तिला तिचे कपडे काढण्यास सांगितले आणि त्याच्या फोनवर हे सर्व रेकॉर्ड केले, असे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीचा हवाला देऊन सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेने नंतर वॉशरूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीला आतून बंद करून ती घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. परिसरातील रहिवाशांना या महिलेने मदत मागितली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा :

Pune accident : बारामतीच्या नेपतवळणजवळ ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॉलीला आयशर टेम्पोची धडक; सात मजुरांसह नऊ जण गंभीर

Nagpur Crime | हैदराबादवरून एमपीकडं जाणारा 197 किलो गांजा जप्त, नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.