Real Estate : पुण्यात घरांची विक्री मंदावली; आगामी सणासुदीच्या काळात गृह खरेदीदार वाढतील, रिअल इस्टेट अभ्यासकांना आशा

अंतर्गत खर्चावरील चलनवाढीच्या दबावामुळे विकासकांना गेल्या काही महिन्यांत मालमत्तेच्या किंमती वाढवण्यास भाग पाडले. त्यासोबतच आरबीआयने दोन दरांत वाढ केली, ज्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढले.

Real Estate : पुण्यात घरांची विक्री मंदावली; आगामी सणासुदीच्या काळात गृह खरेदीदार वाढतील, रिअल इस्टेट अभ्यासकांना आशा
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 02, 2022 | 7:30 AM

पुणे : पुण्यात घरांची विक्री मंदावली आहे. रिअल इस्टेटच्या (Real Estate) अहवालावरून ही बाब ठळक झाली आहे. रिअल इस्टेट निरीक्षक अॅनारॉकने त्यांच्या त्रैमासिक अहवालात म्हटले आहे, की पुणे महानगर प्रदेशातील (PMR) घरांची विक्री एप्रिल-जून 2022मध्ये मागील तीन महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत सुमारे 11% कमी झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर ही 15% घट आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे, की पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) या भारतातील दोन प्रमुख बाजारपेठा आहेत, ज्यामध्ये एप्रिल-जून या कालावधीत नवीन घरांच्या लाँचच्या संख्येत अनुक्रमे वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी-मार्च 2022च्या तुलनेत अनुक्रमे 14% आणि 26% वाढ यात झाली आहे. आता येत्या काळात सणासुदीच्या दिवसात तरी गृहखरेदीदारांचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा आणि आशा या क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.

अंतर्गत खर्च वाढला

घरांच्या विक्रीतील घसरण रिझव्‍‌र्ह बँकेने मुख्य दरांमध्ये वाढ केल्यानंतर झाली आहे. ज्यात सायकलबाहेरील एक वाढ, तसेच वाढता अंतर्गत खर्च, विशेषतः सिमेंट आणि स्टील यांचा समावेश आहे. रिअल इस्टेट निरीक्षकांनी सांगितले आहे, की हे सर्व घटक गृह खरेदीदारांसाठी महत्त्वाचे असतात. परवडणारे घर घेताना अशा बाबींचा वाढता खर्च गृहखरेदीत अडसर ठरतो. महागाईची कमी पातळी, मुद्रांक शुल्कात कपात यांसारखे सरकारी प्रोत्साहन तसेच कमी व्याजदर यामुळे गृहखरेदीचे प्रमाण वाढले होते. त्याचा वेग आता मंदावला आहे.

विकासकांनीही वाढवला दर

अंतर्गत खर्चावरील चलनवाढीच्या दबावामुळे विकासकांना गेल्या काही महिन्यांत मालमत्तेच्या किंमती वाढवण्यास भाग पाडले. त्यासोबतच आरबीआयने दोन दरांत वाढ केली, ज्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढले. यामुळे गृहखरेदी करणार्‍यांसाठी एकूण मालमत्ता संपादन खर्चात वाढ झाली तर घरांच्या विक्रीत घट…

हे सुद्धा वाचा

आगामी सणासुदीत गृहखरेदी वाढण्याचा अंदाज

मागील तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जून यादरम्यान सुट्ट्यांचा कालावधी होता. शिवाय या काळात कोविडची अशी कोणतीही साथ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली नाही. त्यामुळे अनेकजण फिरण्याच्या मूडमध्ये दिसले. त्याचा परिणाम या विक्रीवर झाल्याची शक्यता काहींनी व्यक्त केली आहे. तर क्रेडाईच्या मते, घरांबाबत विचारणा, चौकशी होत आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि या सततच्या घरांच्या चौकशी यामुळे खरेदीदार घर घेण्यासाठी प्रवृत्त होतील.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें