
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणात DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक दिसले. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विमान अपघातामागे कुणाचा हात आहे ,यावरून मोठे भाष्य केले. त्यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा उल्लेख पण केला. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या जवळ अनेक लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा आता होत आहे.
FIR दाखल झाला पाहिजे
आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी गुन्हा दाखल करण्याविषयी पुन्हा आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले की विमान अपघात हा गुन्हा १०० टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही. अजितदादांची दखल घेतली जात नाही असं व्यक्तीमत्त्व होतं का. सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करा. आमचं काही म्हणणं नाही. पण एफआयआर दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली केली आहे.
कॉज ऑफ अॅक्शन आला आहे. त्या आधारे एफआयआर दाखल झाला पाहिजे. दादांना न्याय का मिळत नाही. एफआयआर का दाखल करत नाही. आम्ही चुकीचा एफआयआर दाखल करत असू तर आमच्यावर कारवाई करा. आम्हाला तुरुंगात टाका. पण ऐकत नाही. कुणाला तरी वाचवलं जात आहे. कुणाचा तरी प्रेशर आहे. पोलीस अशा पद्धतीने वागत असल्याने हा घातपात आहे का हा संशय निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
अपघातामागे कुणाचा हात?
व्हीएसआर कंपनीचे मालक अनेक मोठ्या लोकांच्या जवळचे आहेत. रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातील मोठा नेता गेला होता. आंध्राचा नेता गेला. त्याच्या एनबीएससी कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला. त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांना खराब विमान दिलं हे डीजीसीए सांगतं. त्यामुळे हे विमान मुद्दाम दिलं का. यामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला. चौकशी अपघतावर होतेय. चौकशी कराच. पण घातपात आहे का, क्रिमिनिल अँगल आहे का याचीही चौकशी करा. ते केलं जात नाही. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे. हा संशय आहे, असा मोठा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला.