मोठी बातमी : ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांच्या दुजोऱ्याने माजी मंत्र्यांच्या अडचणी वाढल्या

ज्या ऑडिओ क्लिप्समुळे (Sanjay Rathod Audio clip) संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे.

मोठी बातमी : ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांच्या दुजोऱ्याने माजी मंत्र्यांच्या अडचणी वाढल्या
शिवसेना नेते संजय राठोड
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 7:03 PM

पुणे : माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पुन्हा एकदा कॅबिनेटच्या दारापर्यंत आले होते, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची चर्चा होती. मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे (Sanjay Rathod Audio clip) संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे. एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील (Forensic report ) ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (Pune Police) दिली आहे. त्यामुळे राठोडांच्या मंत्रिपदाचं स्वप्न तर दूरच, उलट त्यांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

फॉरेन्सिकचा रिपोर्ट आता समोर आला असला, तरी भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. एका तरुणीचा मृत्यू, तरुणी आणि मंत्र्यामध्ये फोनवर झालेलं संभाषण या दोघांची कडी जुडते.

मात्र तरीही एक साधा फॉरेन्सिकचा रिपोर्ट यायला 6 महिने का लागतात?

जर आवाज संजय राठोड यांचाच असेल, तर कारवाई का झाली नाही?

पुणे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावर या प्रकरणाचा तपास दाबला? हे चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत.

कारवाईसाठी उशीर का?

तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाला, किंवा तिनं आत्महत्या केली, की मग थेट तिचा खून झाला, यावर भाजप आधीपासून प्रश्न उभं करत आलं आहे. एकीकडे तरुणीच्या नातलगांकडून कोणतीही तक्रार झाली नाही. मात्र जर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आवाज संजय राठोड यांचाच असल्याचं सिद्ध झालं असेल, तर पोलीस कारवाईसाठी मुहूर्त का शोधत आहेत, असा प्रश्न आहे.

जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा संजय राऊतांपासून सर्वच शिवसेना नेते चौकशीअंती बोलणं योग्य असल्याचं म्हणत होते. आता त्याच चौकशीतला एक टप्पा पूर्ण होऊनही शिवसेना नेते सावधच भूमिका घेत आहेत.

उशिरानं घेतलेल्या राजीनाम्यानं याआधीच उद्धव ठाकरेंच्या संयमी, सोज्वळ प्रतिमेला धक्का पोहोचला होता. आता फॉरेन्सिक रिपोर्टनंतर पुन्हा तीच दिरंगाई शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परळीच्या तरुणीची पुण्यात आत्महत्या

पुण्यातील वानवडी परिसरातील महंमदवाडी परिसरात 7 फेब्रुवारी 2020 रोजी मूळच्या परळीतील 22 वर्षीय तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप आणि आत्महत्या केलेल्या तरुणीचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे फोटो व्हायलर झाले, आणि शेवटी राठोडांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि आत्ता त्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेने हा अहवाल पुणे पोलिसांना दिला आहे. पण यासगळ्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावरच शंका उपस्थित केली आहे.

11 वेळा फोनकॉलच्या 11 ऑडिओ क्लिप 

क्लिप पहिली:

कथित मंत्री: कुठे आहेस तू? (अरुण राठोडला उद्देशून) नंतर मला मंत्रालयात मिटिंग आहे.कथित मंत्र्याचा अरुण राठोड नावाच्या कार्यकर्त्याचा या क्लिपमध्ये संवाद सुरू आहे. ते अरुणला त्याची विचारपूस करतात. त्याला मंत्रालयात बोलावतात. दोघंही बंजारा भाषेतच बोलत आहेत. अवघी 50 सेकंदाची ही क्लिप आहे.

क्लिप दुसरी:

मंत्री: कुठे आहेस अरुण तू? समजवलं का पूजाला? येतोय ना तू?

अरुण: हो ठिक आहे ठिक आहे. मी येतो.

थोडावेळ काहीच संवाद होत नाही. नंतर दोघांमध्ये पूजाला समजावण्याबाबत चर्चा होते. तू येणार आहेस का?, असं मंत्री अरुणला विचारतात. पूजाला समजावून सांगायला सांगतात. ही 42 सेकंदाची क्लिप आहे.

क्लिप तिसरी

मंत्री: अरुण कुठे आहेस तू? अरुण: एक्सप्रेस हायवेला आहे. दोन तास लागेल यायला. (मोबाईलवर गाड्यांचा कर्णकर्कश आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे अरुण वाहतूक कोंडीत अडकल्याचं स्पष्ट होतं.) मंत्री: एवढा लेट का? अरुण: वाहतूक कोंडी होती. गाडीवालाही लेट आला. मंत्री: तीन तास म्हणजे खूपच उशीर आहे. अरुण: संध्याकाळी भेटणं जमणार नाही का? मंत्री: ठिक आहे. तू ये. नंतर बघू. आल्यावर फोन कर. अरुण: हाव. ओके. या दोघांमध्ये 1 मिनिट 18 सेकंदाचं बोलणं होतं. अरुण प्रवासात असल्यानं त्यांचं जुजबीच बोलणं झाल्याचं दिसून येतं.

क्लिप चौथी

या क्लिपमध्ये दोघेही मराठीत बोलत आहेत. त्यात पूजाच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगानेच चर्चा सुरू असल्याचं दिसतं.

अरुण: सुसाईडचं वेड तिच्या डोक्यातून काढा. मंत्री: ठिक आहे. काय करावं आता. अरुण: तेच तिच्या डोक्यातून काढा. सुसाईड हा पर्याय नाही. खूप आयुष्य आहे अजून. मंत्री: तेच तर सांगत आहे तिला मी. अरुण: ती कितीतरी मुलींची आयडॉल आहे. तिच्या सारखं बनायला बघतात पोरी. सुसाईड करतेय म्हटल्यावर अवघड आहे. मंत्री: हम्म अरुण: असं थोडीच असतं. मंत्री: तू कुठे आहे? बाहेर आहे का? ये ना. अरुण: तुम्ही बोला. मंत्री: काय बोलू तिला. एवढं क्लिअर बोलूनही त्याच मुद्द्यावर असेल तर… अरुण: त्या दिवशीपासून सांगतो ट्रिटमेंट करू, नाहीच म्हणत होती. आज म्हणाली, तू आणि ते सांगतात तर ट्रिटमेंट करते. पण नंतर इलाज केल्यावर सुसाईड करेल म्हणते. असं थोडीच असतं. मंत्री: हम्म नंतर बराच गॅप जातो. संभाषण थांबतं. अरुण: असं थोडीच असतं. तुम्ही काढा तिच्या डोक्यातून. मंत्री: हम्म. तुला काय म्हणत होती ती. काही तरी म्हटली ना. काही तरी आणून दे म्हणून… कशाला सांगितलं तू? अरुण: कशाला म्हणजे? गरजेचं आहे सांगणं. असं थोडीच असतं. सुसाईड म्हणजे काय… मंत्री: ठिक आहे. तू कुठे आहे, इथेच आहे ना? अरुण: हां इथेच आहे. डोक्यातून काढा तिच्या तेवढं सुसाईडचं. सुसाईड हा ऑप्शन नाही हे ना.

मंत्री: हो

अरुण: ठेवू या दोघांमधील हा संवाद दोन मिनिटं 24 सेकंदाचा आहे. त्यात दोघंही पूजाच्या आत्महत्येबाबत चर्चा करत आहेत. अरुण हा पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कथित मंत्र्याला पोटतिडकीने गळ घालत आहे.

क्लिप पाचवी

ही क्लिप 1 मिनिट 31 सेकंदाची आहे. त्यात हा मंत्री मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी अरुणला सांगत आहे. त्यात एका मुलीचा आवाजही येतो. तीही या मंत्र्याशी बोलते. ही मुलगी मंत्र्याला जेवण झालं का विचारत आहे. बहुतेक ती पूजा असावी. तर मंत्री तिला ज्यूस किंवा मंच्युरिअन आणून खायला सांगत आहे. मुलगीही या मंत्र्याला पटकन यायला सांगत आहे. त्यानंतर मंत्रीही तिला होकार देतात.

क्लिप सहावी

या क्लिपमध्ये हा मंत्री अजितदादासोबत मिटिंग असल्याचं अरुणला सांगतो. रात्री या मुलीला समजावलं पण ती ऐकत नसल्याचंही ते सांगतात. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, पण आत्महत्या करणं हा ऑप्शन नाही ना?. त्यावर, मग मी काय करू? असा हतबल सवाल मंत्री करतात. तेव्हा कार्यकर्ता म्हणतो, तिला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. तिला तुम्ही भेटा आणि समजवा. अरुणच्या या आग्रहानंतर मंत्रीही तिच्याशी चर्चा करायला तयार होतात. एखादी गाडी कर. तिला मुंबईत घेऊन ये. चर्चा करू, असं मंत्री सांगतात. अरुणही उद्या सकाळी येऊ का? असं विचारतो. त्यावर होय, असं उत्तर मंत्री देतात. ही क्लिप 2 मिनिटं 13 सेकंदाची आहे.

क्लिप सातवी

ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत. मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो. अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल. मंत्री: कन्व्हिन्स कर तू. अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो. मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो. त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो. मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो. मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही. अरुण: मी करतो कन्व्हिन्स

काही वेळाने पुन्हा संवाद सुरू होतो.

अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.

मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.

अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे

मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.

मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…

अरुण: ठिक आहे.

क्लिप आठवी

ही 2 मिनिटे 22 सेकंदाची क्लिप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात या पूजाचा मृत्यू झाल्याचं कळतं. पूजाने आत्महत्या केल्यानंतरचा हा संवाद आहे. त्यात मंत्री हे अरुणला पूजाचा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. दरवाजा तोडून आत जा, विलाससोबत आत जा आणि मोबाईल ताब्यात घे. तू फक्त मोबाईल ताब्यात घे, असं ते सांगतात. त्यानंतर पाठिमागे कुणाचा तरी आवाज येतो. पोलिस बोलत असल्याचं जाणवतं. पोलीस सीपीआर दे म्हणून सांगत आहेत. त्यानंतर पूजाचा मृत्यू झाल्याचं अरुण मंत्र्याला सांगतो. डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाल्याचं तो सांगतो. तुम्ही येणार आहात का म्हणून अरुण विचारतो. तुमचा फोन सुरूच राहू द्या असंही तो सांगतो. (must listen 11 viral clips of Pooja Chavan Suicide case in pune)

क्लिप नववी:

या क्लिपमध्ये 8 मिनिटं 47 सेंकदाचा संवाद आहे. अरुण रुग्णालयात असून तिथेच त्यांचं मंत्र्याशी फोनवरून संभाषण सुरू असल्याचं दिसतं.

मंत्री: तू आधी फोन घे अरुण: हॉस्पिटलच्या बाहेर आहे. आत सोडत नाहीत. मंत्री: नातेवाईक आहे म्हणून सांग. पटकन जा आत. त्यानंतर फोनमध्ये कुणाचा तरी आवाज येतो. बहुतेक पोलीस अरुणची चौकशी करत आहेत. तिने उडी मारली का? मुलीचं नाव काय? तिचं वय काय? पत्ता काय? असं अरुणला विचारलं जातं. त्यावर मुलीचं नाव पूजा चव्हाण. वय 22. पत्ता परळी वैजनाथ. आता पुण्यात मोहम्मदवाडी, हेमंत पार्क लेन क्रमांक 10मध्ये राहत असल्याचं अरुण सांगतो. त्याचं नावही तो अरुण राठोड म्हणून सांगतो. त्याचं वय 24 असल्याचं आणि पुण्यात पूजासोबतच राहत असल्याचं तो सांगतो. तिचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगतो. मुलगी कशी पडली? असं त्याला विचारलं जातं. तेव्हा ती पडली तेव्हा बघितल्याचं सांगतो. ती कशी पडली हे कळलं नसल्याचं तो सांगतो. त्यावर ती पडली की तिने उडी मारली? असा सवाल पोलीस करतात. त्यानंतरच संभाषण अर्धवट तुटतं. थेट मंत्र्यांशी संवाद सुरू होतो.

मंत्री: हां, अरुण अरुण: जबानी नोंदवत होते. गॅलरीबाबत विचारत होते. मंत्री: गॅलरीतून मोबाईल काढ. पुन्हा पोलीस अरुणला काही विचारतात. संभाषण तुटतं. नंतर मंत्री आणि अरुणचं पूजाच्या उपचाराबाबत संभाषण सुरू होतं. डॉक्टरांनी तिचा श्वास पाहिला. नाडी चेक केली. तिला पंप दिला, असं तो सांगतो. ती डोक्यावर आपटली. सिमेंटच्या रोडवर तिचं डोकं आदळल्याचं तो सांगतो. त्यावर मंत्री त्याला पुन्हा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. कुणाच्याच हाती मोबाईल लागू देऊ नका असंही सांगतात. त्यानंतर पुन्हा संपर्क तुटतो. आता अरुणचा पोलिसांशी संवाद सुरू होतो. मी तिचा सख्खा चुलत भाऊ. आम्ही तिघं एकाच रुममध्ये राहतो, असं तो पोलिसांना सांगतो. पुन्हा त्याचा मंत्र्याशी संवाद सुरू होतो. मंत्री हॅलो हॅलो करतात. पण प्रतिसाद येत नाही. विलास…. अरुण… अरुण… असा आवाज देतात पण आवाज येत नाही. काही वेळ असाच जातो.

त्यानंतर पुन्हा संवाद सुरू होतो. मंत्री अरुणला म्हणतात, तू कर पहिलं. काहीही चॅटमार. काहीही हालचाल कर. बाजूलाच राहा. फोन करत राहा. त्याचवेळी मंत्री त्याला फोन ताब्यात घ्यायला सांगतात. नातेवाईकांना गावावरूनही आणायला सांगतात. (must listen 11 viral clips of Pooja Chavan Suicide case in pune)

क्लिप दहावी

मंत्री: तू काहीच करू नको बस. चिंता करू नको. मदत करू. मी सांभाळतो. माझ्यावर भरोसा ठेव. ठिक आहे? अरुण: हो. पूजाने आत्महत्या केल्यानंतर या दोघांमध्ये संवाद होतो. त्यात मंत्री आपण सर्व काही पाहून घेत असल्याचं सांगताना दिसत आहे. ही एक मिनिट दोन सेकंदाची क्लिप आहे.

क्लिप अकरावी

शेवटची क्लिप ही 2 मिनिटं 22 सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचं शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊ विलासही आहे.

अरुण: पोस्टमार्टेम सुरू आहे. मंत्री: असं का… मंत्री: दोरीने चढ आणि मोबाईल काढ. चऱ्हाटाने जा.

त्यानंतर मंत्री विलासशी संवाद साधतात.

विलास: सर काय करू? (विलासचा सूर रडवेला आहे. तो घाबरलेला आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं) मंत्री: काय करू शकतो विलास? ( मंत्र्याच्या या प्रश्नानंतर विलास रडायला लागतो) मंत्री: तू हिंमतीने काम घे. विलास: काय करू? डॉक्टर म्हणतात पीएम (शवविच्छेदन) करा. मंत्री: दुसरी काय करू शकतो आपण.

त्यानंतर अरुण आणि मंत्र्याचा संवाद होतो. मंत्री त्याला घराचं बांधकाम तोडून आत जायला सांगतात. तसेच कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. मोबाईल ताब्यात घे. दरवाजा तोड. आवाज आला तरी चालेल, असंही ते सांगतात. (must listen 11 viral clips of Pooja Chavan Suicide case in pune)

VIDEO :

संबंधित बातम्या  

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.