दोन वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा ; विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात ग्रामीण भागातील शाळा पुन्हा सुरु

वडगाव मावळमध्ये ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शाळेपासून लांब राहिलेली मुले शाळा सुरु झाल्याने पुन्हा एकदा आनंदली आहेत.

दोन वर्षांनंतर वाजली शाळेची  घंटा ; विद्यार्थ्यांच्या किलबिलाटात ग्रामीण भागातील शाळा पुन्हा सुरु
प्रातिनिधिक फोटो

पुणे – पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळेची घटना पुन्हा एकदा वाजली आहे. आजपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.  वडगाव मावळमध्ये ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शाळेपासून लांब राहिलेली मुले शाळा सुरु झाल्याने पुन्हा एकदा आनंदली आहेत.

पुष्प गुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत

मावळमध्ये सभापती कृषि व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांनी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पोटोबा महाराज प्रांगण ते मुख्य बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गाजरामध्ये मिरवणूक काढली. शिक्षकांनी तसेच गावातील शिक्षकांनी तसेच गावातील नागरिकांनी पुष्प गुच्छ देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत प्रशासनही सज्ज झाले आहे. ओमिक्रॉनच्या स्थितीचा आढावा घेऊनच मुंबई – पुण्यातील शाळांचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत तेथील जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून शाळांचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्या म्हणालया आहेत.

नियमाचे पालन बंधनकारक शाळा सुरु करण्यात आल्या असल्यातरी कोरोनाबाबत राज्यसरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याबरोबरच सोशल डिस्टन्सचे पालन करणेही बंधनकारकआहे.

जिल्हा प्रशासन सर्तक दुसरीकडे ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना जिल्हा प्रशासन अलर्ट आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. असून त्यांची माहिती घेतली जात असून या सर्व नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रमुखांनी दिली आहे.

RRB NTPC CBT 2 : आरआरबीकडून एनटीपीसी सीबीटी-2 परीक्षेच्या तारखा जाहीर, पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जानेवारीत

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

शिवसेनेच्या UPA मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या, सूत्रांची माहिती; संजय राऊत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेणार

Published On - 2:34 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI