RRB NTPC CBT 2 : आरआरबीकडून एनटीपीसी सीबीटी-2 परीक्षेच्या तारखा जाहीर, पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जानेवारीत

रेल्वे भरती बोर्डान नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. आरआरबीनं जारी केलेल्या सूचनेनुसार परीक्षेचं आयोजन 2022 मध्ये केलं जाणार आहे.

RRB NTPC CBT 2 : आरआरबीकडून एनटीपीसी सीबीटी-2 परीक्षेच्या तारखा जाहीर, पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जानेवारीत
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 2:21 PM

नवी दिल्ली: रेल्वे भरती बोर्डानं (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. आरआरबीनं जारी केलेल्या सूचनेनुसार परीक्षेचं (RRB NTPC CBT 2 exam) आयोजन 2022 मध्ये केलं जाणार आहे. ही परीक्षा 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. याशिवाय आरआरबीनं एनटीपीसी सीबीटी -1 निकालाची तारीख जाहीर केली आहे.

फेब्रुवारीत परीक्षा

आरआरबीनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दक्षता घेत परीक्षेचं आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे. फेब्रुवारीमधील स्थिती पाहून परीक्षांच्या तारखा बदलण्याची आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं आरआरबीनं कळवलं आहे. rrbcdg.gov.in या वेबसाईटवर नोटीस जारी केलं आहे.

आरआरबीनं जारी केलेल्या नोटीसनुसार एनटीपीसी सीबीटी-1 परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 मध्ये जाहीर केला जाणार आहे. फर्स्ट स्टेज सीबी आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल 15 जानेवारी 2022 पर्यत जाहीर केला जाणार आहे. आरआरबीच्या विविध प्रादेशिक वेबसाईटस वर निकाल जाहीर केला जाईल. उमदेवारांनी ज्या विभागातून अर्ज केला असेल त्या विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. उमेदवार तिथं निकाल पाहू शकतात.

आरआरबी एनटीपीसी सीबीटी-2 चं प्रवेशपत्र कधी मिळणार?

आरआरबी एनटीपीसी सीबीट परीक्षा 1 चा निकाला जाहीर झाल्यानंतर सीबीटी 2 परीक्षा आयोजित केली जाणार आहे. जे विद्यार्थी पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण होती त्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी संधी मिळणार आहे. एनटीपीसी सीबीटी 2 साठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेशपत्र दिली जातील. जानेवारी 2022 ज्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळं आरआरबी एनटीपीसी परीक्षा 7 वेळा स्थगित केल्यानंतर 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांनी परीक्षेच्या निकालासाठी आणि इतर अपडेटसाठी आरआबी एनटीपीसी च्या वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या:

शिवसेनेच्या UPA मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या, सूत्रांची माहिती; संजय राऊत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेणार

Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!

RRB NTPC CBT 2 exam date admit card result official update check at rrbcdg gov in

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.