Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!

यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा पेटला
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 1:30 PM

औरंगाबादः महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामकरण करण्याच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली जात आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री संभाजीनगर या नावावर भर देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने शहराचे नाव औरंगाबादच राहील, अशी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेवले, तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचे नाव घेताना संभाजीनगर असाच उल्लेख करते. दरवेळी महापालिका निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा तापवला जातो. विशेष म्हणजे यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सर्वसाधारण सभेतील ठरावाने कल्याण काळे अडचणीत

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाला पाठवला. या ठरावानंतर औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या ठरावामुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे अडचणीत आले असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन या वादावर म्हणाले, ”शहराचे नाव कुणीही काहीही घेतल्याने काही फरक पडत नाही. आमच्या नेत्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबाद हेच नाव राहील.” तर काँग्रेसचे शहराध्यक्ष  मोहम्मद हिशाम उस्मानी म्हणाले, ”इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करून नये, औरंगाबादचे नव्हे तर राज्य व देशातील कोणत्याही शहराचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मित्रपक्ष असो वा कुणीही अशी मागणी केली तरी आम्ही त्याला विरोधच करणार.” शहरातील एका वृत्तपत्राला या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.

इतर बातम्या-

Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात

मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....