70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

शातांबाई तावरे यांनी गावच्या पुढाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी निवडणुकीचा अर्ज भरलाय.(Shantabai Taware Gram Panchayat Election)

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार
शांताबाई तावरे, साठे ग्रामपंचायत उमेदवार
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

सातारा: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची ( Gram Panchayat Eletion) रणधुमाळी सुरु आहे. 14 हजार 232 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसीलदार कार्यालय गजबजली आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साठे गावातील 70 वर्षांच्या शांताबाई तावरे या आजी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. विकासकामं न करणाऱ्या पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. (Seventy years old Shantabai Taware contesting Sathe village Gram Panchayat Election)

पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

सातारा जिल्हयातल्या फलटण तालुक्यातील साठे गावच्या पुढारयांना अद्दल घडविण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं शांताबाई तावरे यांनी सांगितले. गावातील रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं शांताबाई तावरे म्हणाल्या. सातारा जिल्हयातल्या फलटण तालुक्यातील साठे गावातून शांताबाई तावरे यांनी साठे फाटा वार्ड क्रमांक 1 मधून अर्ज भरला आहे. साठे गावाची लोकसंख्या 2 हजार असून ग्राम पंचायतीची सदस्य संख्या 9 इतकी आहे.

साठे गावचा विकास हाच निर्धार असल्याचे सांगून गावात महिलांवर होणारे अन्याय हे लवकर थांबवणार असल्याचे शांताबाई म्हणाल्या. तसेच गावच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा अभाव असून त्या सुविधा राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शांताबाई तावरे म्हणाल्या.

दारुबंदी करण्याचा मानस

शातांबाई तावरे यांनी साठे गावात दारुबंदी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. गावातील आरोग्य सुविधा, लाईट, पाणी या व्यवस्था नागरीकांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत. यासाठी वयाच्या ७० व्या वर्षी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचं शांताबाई तावरे यांनी सांगितले. 70 वर्षीय शांताबाई तावरे या आजीच्या उमेदवारीची चर्चा साठे गावासह फलटण तालुक्यात चर्चा चांगलीच रंगली आहे.

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठ्या नेत्यांनी फिल्डींग लावल्याचं चित्र राज्यभरात दिसून आले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि अर्ज मागं घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

नको मोबाईल, नको पेन ड्राईव्ह, कपबशीच पाहिजे!

(Seventy years old Shantabai Taware contesting Sathe village Gram Panchayat Election)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.