एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शरद पवार यांचा पाठिंबा?, काय आहे विषय, कोणी केला दावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन देशात राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत वक्तव्य केले अन् त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका शरद पवार यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे गटातील आमदाराने केलाय.

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शरद पवार यांचा पाठिंबा?, काय आहे विषय, कोणी केला दावा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:19 PM

रवी लव्हेकर, सोलापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची चिन्ह दिसत असतानाच आता काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच सावरकर यांच्यांविषयी मत मांडले आहे. त्यावर बोलताना शिंदे गटातील आमदाराने मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अप्रत्यक्षपणे मान्य केली, असा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे.

काय आहे विषय

हे सुद्धा वाचा

सावरकरांच्या मुद्द्यावरून शिंदे साहेबांच्या भूमिकेला शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.  स्वातंत्र्यवीरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी घेतलेली भूमिका शरद पवार यांनी दिल्लीमध्ये घेतली. हा विषय निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मत सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

काय होता विषय

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, माझी खासदारकी रद्द झाल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी मला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही सर्व मिळून काम करू, असं राहुल गांधी म्हणाले. तुम्ही माफी मागितली असती तर तुमची खासदारकी वाचली असती. तुम्ही माफी का नाही मागितली? असा सवाल राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर मी गांधी आहे. गांधी कधीच माफी मागत नाही. मी सावरकर नाहीये, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली. आता शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध केला.

संजय राऊत यांनी फक्त शिंदेच दिसतात

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फक्त झोपताना, उठताना, भाकरी खाताना शिंदे साहेब दिसतात, असा खोचक आरोप शहाजी बापू यांनी केला. ते म्हणाले की, संजय राऊत यांची मोठी अडचण झाली आहे. गेले 25 वर्षे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लिहिले. आता त्यांची त्रेधा तिरपीट होत आहे.

उद्धव ठाकरे यांनी भूमिका पटणार

शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यांसंदर्भात मत मांडले. ते म्हणाले, उद्धव साहेबांचा आदर ठेवूनच आम्ही शिवसेनेसाठी परिवर्तन केले. आम्ही त्यांच्या शिव्या खाऊ, पण आमची भूमिका त्यांना एक दिवस पटेल, असा दावा आमदार शहाजी बापू यांनी केला.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.