AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा सर्वात मोठा निर्णय, थेट अभिजीत दीपके यांना… उद्याच्या मोर्चापूर्वीच मोठ्या घडामोडी?

कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोगातील कथित घोटाळ्याविरोधात मुंबईत जेलभरो आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून, ठाकरे बंधूंनीही समर्थन दिले आहे. 2 ऑक्टोबर रोजी दादरच्या शिवाजी पार्कात होणाऱ्या या मोर्चात राज्यभरातून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. .

शरद पवार यांचा सर्वात मोठा निर्णय, थेट अभिजीत दीपके यांना... उद्याच्या मोर्चापूर्वीच मोठ्या घडामोडी?
abhijit dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 10:08 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोगातील कथित घोटाळ्याच्या विरोधात मुंबईत जेलभरो आंदोलनाची घोषणा दिली आहे. या जेलभरो आंदोलनात राज्यातूनच नव्हे तर देशातून जेनजी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मोर्चाच्या एक दिवसाआधीच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी दीपके यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दीपके यांचं बळ अधिकच वाढलं आहे. मात्र, पवार या मोर्चामध्ये सामील होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी घोषणा केली आहे. उद्या 2 तारखेला अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात मुंबईत जेलभरो आंदोलन होणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिबा आहे. तसेच येत्या 4 तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार आहे. या मोर्चालाही आमचा पाठिंबा असणार आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केलं. मात्र, या दोन्ही मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार की नाही याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे या दोन्ही मोर्चांमध्ये शरद पवार सामील होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंचाही पाठिंबा

दरम्यान, उद्या होणाऱ्या अभिजीत दीपके यांच्या मोर्चाला ठाकरे बंधूंनीही पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा दर्शवला आहे. अभिजीत दीपके यांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. यावेळीही त्यांनी मुंबईत आंदोलन पुकारलं आहे. आमचा त्यालाही पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर प्रत्येकाने मोर्चे, आंदोलनं केली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येणााऱ्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्या जेलभरो…

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने उद्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या शिवाजी पार्कात हा मोर्चा होणार आहे. या मोर्चाला शेकडो तरुण उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वत: अभिजीत दीपके या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे उद्या शिवाजी पार्कात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?